www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मंत्रीपदांची नावं निश्चितीसाठी मुख्यमंत्री, माणिकराव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे.
शपथविधी आजच होणार असल्यानं अब्दुल सत्तार, अमित देशमुख, बागवे, यशोमती ठाकूर यांच्या
नावांची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचा दोनच दिवसांपूर्वी शपथविधी झाला. मग काँग्रेसनं आज का? ही पुन्हा आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं सुचवतंय का? हा प्रश्न यामुळं निर्माण होतोय. आघाडी दोन वेगवेगळं सरकार राज्याला देवू पाहतंय का?, असंही विचारलं जातंय.
देशात अजूनही नरेंद्र मोदींची लाट आहे. त्यात राज ठाकरेंनीही निवडणूक रिंगणात उतरण्याचं जाहीर केल्यानं. आघाडीनं त्यांच्या भविष्यासाठी एकत्र काम करणं गरजेचं आहे. मात्र आघाडीच्या सरकार विस्ताराच्या वेगवेगळ्या शपथविधी कार्यक्रमातून मात्र वेगळे संकेत मिळतायेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.