विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटणार?

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोर जावं लागलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधला संघर्ष अजून संपलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आघाडी बाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असं सांगत आघाडी राहीलच अशी शक्यता नसल्याचे संकेत दिलेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 25, 2014, 09:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोर जावं लागलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधला संघर्ष अजून संपलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आघाडी बाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असं सांगत आघाडी राहीलच अशी शक्यता नसल्याचे संकेत दिलेत.
माणिकराव ठाकरे काय किंवा पतंगराव कदम काय ते जे बोलले तो त्यांचा प्रश्न आहे असं सांगतांना आघाडीच विधानसभेला सामोरं जाणार का? या प्रश्नाला उत्तर देताना या बाबतीत वरिष्ठ निर्णय घेतील, असं सांगत त्यांनी आघाडीच्या शक्यतेवर स्पष्ट बोलण्याचं टाळलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.