www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मतदारांनी जास्तच जास्त मतदान करावं, यासाठी राजस्थानच्या जयपूर आणि जोधपूरमध्ये अनोखी शक्कल लढवण्यात येत आहे.
जयपूर आणि जोधपूरमधील चार हॉस्पिटल्सने मतदान करणाऱ्यांना वैद्यकीय फीमध्ये सूट देण्याची घोषणा केली आहे. राजस्थानच्या 25 लोकसभा मतदार संघांसाठी ही सूट देऊ करण्यात आली आहे.
राजस्थानमध्ये 17 आणि 24 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे.
ज्या लोकांना हॉस्पिटलच्या बिलात सूट हवी आहे, त्यांना आपल्या बोटांना लावलेली शाई दाखवावी लागणार आहे, या नुसार मोठ्या आजारातील औषधी आणि फी मध्ये सूट मिळणार आहे.
यात कन्सलटेशन चार्जेसमध्ये 20 टक्के, ओपीडी चार्जमध्ये 10 टक्के, वैद्यकीय तपासणीत 5 टक्के, एंजिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टीमध्ये 5 टक्के सूट देण्यात येणार आहे.
17 एप्रिलला मतदानाचा दिवस आहे, ही सूट फक्त मतदानाच्या दिवशी दिली जाणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.