www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
जळगावमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधलाय. जे अमेठी सांभाळू शकले नाहीत, ते देश काय सांभाळणार? असा सवाल करत देशातून मां-बेट्याला हद्दपार करा, असं आवाहन त्यांनी केलंय.
प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या संपत्तीतील वाढीबाबत बोलत मोदींनी याला `आई-मुलाचं सरकार` असं म्हटलंय. सोनिया गांधींनी अमेठीतील रॅलीमध्ये म्हटलं होतं की, "इंदिरा गांधींनी आपल्या मुलाला राजीव गांधींना देशाला सोपोवलं त्याच पावलावर पाऊल ठेवत मी राहुल गांधीला तुमच्या सुपूर्द केलंय". सोनियांच्या याच वक्तव्याचा मोदींनी समाचार घेतलाय. `हर हाथ लूट, हर बोल झूठ` हा काँग्रेसचा नवा नारा असायला हवा, असंही मोदी म्हणाले.
दुसरीकडं शरद पवार यांचाही त्यांनी समाचार घेतला. कृषिमंत्र्यांच्या राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय का? वेळीच निकाल कळला म्हणून पवार राज्यसभेवर गेले, असा टोलाही त्यांनी लगावला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.