कमी उंचीच्या महिलेचं मतदानात मोठं योगदान

नागपूराची ज्योती आमगे या जगातील सर्वांत कमी उंचीच्या मुलीने आज प्रथमच मतदानाचा हक्क बजावलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 10, 2014, 03:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
नागपूराची ज्योती आमगे या जगातील सर्वांत कमी उंचीच्या मुलीने आज प्रथमच मतदानाचा हक्क बजावलाय.
२१ वर्षाची ज्योती बगडगंज मतदान केंद्रावर कुटुंबीयांसोबत मतदानासाठी हजर झाली होती. पहिल्यांदाच मतदान करत असल्यानं तिला मतदानाची उत्सुकता होती. एक नागरिक म्हणून मी माझे कर्तव्य बजावल्याची भावना यावेळी तिनं व्यक्त केलीय.
अवघ्या २२ इंचाच्या ज्योतीची नोंद जगातील सर्वांत कमी उंचीची महिला म्हणून `गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड`मध्येही झालीय. छोट्या ज्योतीचं देशाच्या भविष्य ठरवण्याच्या या प्रक्रियेतील योगदान मात्र छोटं म्हणता येणार नाही.

व्हिडिओ : काय म्हटलंय ज्योतीनं मतदानानंतर

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.