लालू प्रसाद यादव - किंग नही किंगमेकर हूँ

बिहारमध्ये अनेक वर्षे सत्ता लालू प्रसाद यादव यांनी भोगली. मात्र, विकासाच्या नावाने बोंब दिसून आली. लालूंच्या काळात घोटाळे उघड झालेत त्यानंतर लालूंची सत्ता गेली. आपली सत्ता हातातून जाणार असे लक्षात येतात आपली पत्नी राबडीदेवी यांना राजकारणात उतरवलं.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 4, 2014, 08:04 PM IST

बिहारमध्ये अनेक वर्षे सत्ता लालू प्रसाद यादव यांनी भोगली. मात्र, विकासाच्या नावाने बोंब दिसून आली. लालूंच्या काळात घोटाळे उघड झालेत त्यानंतर लालूंची सत्ता गेली. आपली सत्ता हातातून जाणार असे लक्षात येतात आपली पत्नी राबडीदेवी यांना राजकारणात उतरवलं. बिहारमध्ये महिला मुख्यनंत्री राबडीदेवी झाल्यात आणि सत्ता लालूंच्या घरातच राहिली. मात्र, नितीश कुमार यांच्या लाटेत लालूंचे पानिपत झाले. आता पुन्हा लालूंनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लालूंची कसोटी आहे. चारा घोटाळ्यात लालूंना जेलची हवा खावी लागली आहे.
२९ व्या वर्षी लालू प्रसाद खासदार झालेत. १९४८ मध्ये एका शेतकरी कुटुंबात लालू यांचा जन्म झाला. १९७०मध्ये लालू प्रसाद यादव हे विद्यार्थी नेता म्हणून प्रसिद्धीला आलेत. लालू प्रसाद १९७७मध्ये पहिल्याच निवडणुकीत यश संपादन केले. त्यानंतर ते सक्रीय राजकारणात उतरलेत. १९७७ - १९८० लोकसभेतील उपस्थिती, तसेच बिहार विधानसभा निवडणुकीत दोन वेळा ते निवडणून आलेत.
१९९०मध्ये बिहारमध्ये `रथ` रॅली काढली. यादव आणि मुस्लिमांना आकर्षित करून त्यांचा पाठिंबा मिळवला. तो त्यांचा आधार महत्वाचा ठरला. लालू १९९० आणि १९९७ दरम्यान, मुख्यमंत्री पदाची कमान संभाळली. १९९७मध्ये लालूंनी जनता दलाशी फारकत घेतली आणि त्यांनी स्वत:चा नवा राष्ट्रीय जनता दल (राजद) पक्ष स्थापन केला.
१९९८मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबर युती केली. त्यानंतर ते पुन्हा लोकसभेत गेले. २००४मध्ये ते काँग्रेसमधील प्रमुख घटक पक्ष बनले. काँग्रेसच्या सरकारमध्ये ते रेल्वे मंत्री झालेत. तोट्यात चालणाऱ्या भारतीय रेल्वेला नफ्यात आणण्याची किमया केली.
१९९७मध्ये चारा घोटाळ्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. त्यांची पत्नी १९९७ ते २००५ दरम्यान मुख्यमंत्री झाल्यात. ३० डिसेंबर २०१३ लालू प्रसाद आणि माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यासह अन्य़ ४३ जणांना फसविणे आणि चारा घोटाळा प्रकरणी सीबीआयने दोषी ठरवले. त्यानंतर त्यांना खासदारकी गमवावी लागली. ते जेलमध्ये गेले. डिसेंबर २०१३मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राजद प्रमुख लालू यांना जामीन मंजूर केला.
भारतात विकासामध्ये मागे असलेल्या बिहार राज्याचा विकास करण्याची घोषणाच करून टाकली. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालांप्रमाणे बिहारमधील रस्ते गुळगुळीत आणि चकाचक करण्याची घोषणा केली आणि हा विषय राजकीय मनोरंजनाचा ठरला.
तर २०१४च्या निवडणुकीत आपलीच सत्ता येण्याचा दावा करत मोदींना लांब ठेवण्याचे आवाहन लालू करीत आहेत. तर नितिशकुमार यांना सत्तेतून हद्दपार करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे १६ मे रोजी काय होते याकडे लक्ष आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.