मोदींपुढे मित्र पक्षांचं पाठबळं हे एक आव्हान?
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर भाजपला मित्र पक्षांची मदत महत्वाची ठरणार आहे. कारण यापूर्वीही अटलबिहारी वाजपेयी यांना ही सरकार स्थापण्यासाठी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. एका मताने बहुमताचा प्रस्ताव बारगडला होता, हा इतिहास आहे.
सोनिया गांधी - काँग्रेस ज्यांच्यावर अवलंबून
फोर्ब्सच्या २०१३ सालच्या जगातील सर्वात जास्त शक्तीशाली महिलांच्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी २१व्या क्रमांकावर होत्या. त्यात राजकारणातील तिसऱ्या शक्तीशाली नेत्या. फोर्ब्सच्या जगातील १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत सोनिया गांधी नवव्या स्थानी होत्या.
सुषमा स्वराज - भाजपमधील धगधगतं महिला नेतृत्व
सुषमा स्वराज भारतीय जनता पक्षातील एक धगधगतं व्यक्तीमत्त्व. २००९मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणींच्या जागी त्यांनी लोकसभेचं विरोध पक्षनेते पद सांभाळलं.
राजनाथ सिंहः मन वळविण्यात महत्त्वाची भूमिका
राजनाथ सिंह यांची राजकीय कारकीर्द एका महाविद्यालयातील लेक्चरर पासून सुरू झाली असली, तरी त्यांनी राजकारणात उतरून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली.
राज ठाकरे - मोदींवर प्रेम, उद्धवशी दुरावा नवीन समीकरण
आपला चुलत भाऊ उद्धव ठाकरे याच्याशी मतभेद झाल्यानंतर २००७मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या राजकीय पक्षाची स्थापना राज ठाकरे यांनी केली. जरी हा पक्ष स्थापन केला तरी चुलते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो.
उद्धव ठाकरे - बाळासाहेबानंतर दुसरा वाघ
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेची लोकसभा पहिलीच निवडणूक होत आहे. मात्र, असे असले तरी शिवसेनेची लोकप्रियता काही प्रमाणात कमी झाली आहे.
लालू प्रसाद यादव - किंग नही किंगमेकर हूँ
बिहारमध्ये अनेक वर्षे सत्ता लालू प्रसाद यादव यांनी भोगली. मात्र, विकासाच्या नावाने बोंब दिसून आली. लालूंच्या काळात घोटाळे उघड झालेत त्यानंतर लालूंची सत्ता गेली. आपली सत्ता हातातून जाणार असे लक्षात येतात आपली पत्नी राबडीदेवी यांना राजकारणात उतरवलं.
पी. चिदंबरम - काँग्रेसची जमेची बाजू आहे का?
अर्थमंत्री पी चिदंबरम भारतीय राजकारणातलं अभ्यासू व्यक्तिमत्व मानलं जातं. मात्र यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचं ठरवलं आहे, त्यांच्या जागी त्यांनी आपल्या मुलाला संधी दिली आहे.
प्रकाश करात – थर्ड फ्रंट चालणार का?
प्रकाश करात हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट) आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रकाश करात यांनी १४ राजकीय पक्षांना एका छताखाली आणले आहे. भाजप आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे हाच थर्ड फ्रंटचा उद्देश आहे.
जगनमोहन रेड्डीः सीम्रांध्राचा डिसायडिंग फॅक्टर
जगन मोहन रेड्डी यांना सीमांध्रमधून जोरदार पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. सीम्रांध्र मधील ख्रिश्चन, अल्पसंख्याक जगन मोहन रेड्डीच्या पारड्यात मतं टाकतील असं म्हटलं जातं.
के. चंद्रशेखर राव : टीआरएस ठरणार किंगमेकर
के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वास आलं आहे. स्वतंत्र तेलंगणा हे त्यांच्यासह लाखो कार्यकर्त्यांच स्वप्न होतं.
चंद्राबाबू नायडूः विभाजीत आंध्राचे आशावादी `सीईओ`
एकेकाळी भारतीय राजकारणावर चंद्राबाबू नायडू यांचा दबदबा होता. देशातील दिग्गज राजकारण्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जात होतं, त्यांना सीईओ ऑफ आंध्र प्रदेश म्हटलं जात होतं. एऩडीए सरकारवर वचक ठेवण्यापर्यंत त्यांची राजकीय शक्ती होती.
नवीन पटनायक – १६ मेनंतर किंगमेकर?
नवीन पटनायक हे दिवंगत बिजू पटनायक याचे पूत्र आहेत. ते ओडिशाचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. नवीन पटनायक हे आपल्या वडिलांच्या निधनानंतर राजकारणात आले. त्यानंतर त्यांनी स्वतःला देशातील शक्तीशाली नेता म्हणून सिद्ध केले.