LIVE -निकाल बुलडाणा

प्रोफाईल मतदारसंघाचं : बुलडाणा

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 09:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बुलडाणा

दुपारी ३.०० वाजता अपडेट
Ø बुलडाणा शिवसेनेचे प्रतापराव जाधव 1 लाख 59 हजार 438 मतांनी विजयी
सकाळी 11:03 वाजताअपडेट सातव्या फेरीनंतर प्रतापराव जाधव 45339 मतांनी आघाडीवर
सकाळी 9:42 वाजताअपडेट बुलडाणा - महायुती – प्रतापराव जाधव (शिवसेना) 8282 मतांनी आघाडीवर

मतदारसंघ : बुलडाणा
मतदान दिनांक : १० एप्रिल
एकूण मतदान : ५८.६६ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी - कृष्णराव इंगळे
महायुती – प्रतापराव जाधव (शिवसेना)
भारीप बहुजन महासंघ – सुरेश सुर्वे
अपक्ष - बाळासाहेब दराडे
समाजवादी पार्टी - वसंतराव दांडगे
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
प्रतापराव जाधव - शिवसेना – ३,५३,६७१ मतं - ४१.४६%
राजेंद्र शिंगणे – राष्ट्रवादी – ३,२५,५९३ मतं - ३८.१६%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १३,८२,७३६
पुरुष : ७,२१,२१५
महिला : ६,६१,५२१
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 उट्टे काढण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न
 बुलढाणा हा जवळपास चार दशके राखीव असलेला मतदारसंघ मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर खुला झाला.
 लोकसभा निवडणूक डॉ. शिंगणे यांनी गांभीर्याने घेतली नाही याचीच शिक्षा तेव्हा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने दिल्याचे बोलले जाते. ही सल मनात ठेवूनच यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडून यायचे या उद्देशाने डॉ. शिंगणे कामाला लागले.
 राष्ट्रवादीने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच भाग म्हणून निवडणुकीच्या तोंडावर विदर्भ विभागीय मेळावा शेगावमध्ये आयोजित करण्यात आला होता.
 राष्ट्रवादीमध्ये बाहेरच्या पक्षातून येणाऱ्याला उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे खासदार प्रताप जाधव हे लोकसभेत गेले तरी तेथे फारसे रमले नाहीत.
 शिवसेनेचे संघटन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील नाराजी त्यांना उपयोगी पडू शकते.
 गतवेळचे हिशेब चुकते करण्याकरिता राष्ट्रवादीने जोर लावण्याचे संकेत दिल्याने या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
जातीपातीची समीकरणं
 जिल्ह्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणवर असून त्यानंतर येतो मासावार्गीय समाज, येतो नंतर माळी समाज, मुस्लिम समाज

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.