LIVE -निकाल हातकणंगले

प्रोफाईल मतदारसंघाचं : हातकणंगले

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 09:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, हातकणंगले

दुपारी २.०० वाजता अपडेट
Ø हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राज् शेट्टी पुन्हा विजयी... १ लाख ७७ हजार मतांनी मिळवला विजय
दुपारी १२.०० वाजता अपडेट
Ø हातकणंगले - नवव्या फेरीअखेर राजू शेट्टी ७६,६८२ मतांनी आघाडीवर
सकाळी ८.३० वाजता अपडेट
Ø हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आघाडीवर

मतदारसंघ : हातकणंगले
मतदान दिनांक : 17 एप्रिल
एकूण मतदान : ७०.९० टक्के मतदान

उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – कलप्पा आवाडे
महायुती – राजू शेट्टी (शेतकरी स्वाभिमानी संघटना)
आप – रघुनाथ दादा पाटील
बसपा - चंद्रकांत कांबळे
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
राजू शेट्टी - शेतकरी स्वाभिमानी संघटना – 4,81,025 मतं - 49.17%
निवेदिता माने – राष्ट्रवादी – 3,85,965 मतं - 39.46%
रघुनाथ पाटील - शिवसेना – 55,050 मतं - 5.63%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 14,58,560
पुरुष : 7,43,516
महिला : 7,15,044
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून येण्याची किमया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली.
 सध्या या मतदारसंघात राजू शेट्टी विरुद्ध सारे असे चित्र निर्माण झाले आहे. ऊस गाळणीचा हंगाम सुरू होत असतानाच दरावरून शेट्टी यांनी शड्डू ठोकला आहे. हे सारे त्यांना निवडणुकीत नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
 राजु शेट्टींच्या मतदारसंघातील वर्चस्वामुळे हा मतदारसंघ घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांचीही काचाकूच सुरू होती.
 जैन, लिंगायत समाजाची मते मोठय़ा प्रमाणावर असल्याने शेट्टी यांच्याच समाजाचा उमेदवार उभा करावा, असा प्रस्ताव आहे. मागील
 हंगामाच्या वेळी उसाच्या दरावरून शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनाला शरद पवार यांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याने त्याची प्रतिक्रिया उमटली होती. राष्ट्रवादीसाठी ही बाब त्रासदायक आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.