LIVE -निकाल उत्तर पश्चिम मुंबई

प्रोफाईल मतदारसंघाचं : मुंबई उत्तर पश्चिम

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 09:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, उत्तर पश्चिम मुंबई
2.00 अपडेट
गजानन किर्तीकर यांचा विजय, काँग्रेसचे गुरुदास कामत यांचा केला पराभव
सकाळी 12.10 वाजता अपडेट
पाचव्या फेरीत गजानन किर्तीकर 36,000 मतांनी आघाडीवर
सकाळी 11.20 वाजता अपडेट
पाचव्या फेरीत गजानन किर्तीकर आघाडीवर
सकाळी 11.00 वाजता अपडेट
शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांनी घेतली कामतांवर आघाडी
सकाळी 9.00 वाजता अपडेट
गुरुदास कामत आणि गजानन किर्तीकर यांच्यात चुरस
सकाळी 8.00 वाजता अपडेट
काँग्रेसच्या गुरुदास कामत यांची आघाडी

मतदारसंघ : उत्तर पश्चिम मुंबई
मतदान दिनांक : 24 एप्रिल
एकूण मतदान 52 टक्के
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – गुरुदास कामत (काँग्रेस)
महायुती – गजानन किर्तीकर (शिवसेना)
आप – मयांक गांधी
मनसे – महेश मांजरेकर
सपा - कमाल खान

२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
गुरूदास कामत – काँग्रेस – 2,53,920 मतं - 35.91%
गजानन किर्तीकर - शिवसेना - 2,15,533 मतं - 30.48%
शालीनी ठाकरे - मनसे - 1,24,000 मतं - 17.54%
अबू आझमी - सपा – 84,412 मतं - 11.94%

मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 16,04,992
पुरुष : 8,95,802
महिला : 7,09,190

काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 उच्चभ्रू, झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीय अशी संमिश्र वस्ती असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे गुरुदास कामत यांना गेल्या वेळी तिरंगी लढतीचा फायदा झाला होता.
 ईशान्य मुंबई या आपल्या पारंपरिक मतदारसंघात वातावरण तेवढे अनुकूल नसल्यानेच कामत यांनी मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर नव्याने निर्माण झालेल्या मतदारसंघात मजल मारली.
 यंदा मात्र त्यांना काँग्रेसविरोधातील असलेल्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे.
 गेल्या वेळी पराभूत झालेले शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांनी यंदा जोर लावलाय. गेल्या वेळी मनसेच्या उमेदवाराला मिळालेली लाखभर मते ही कामत यांच्या पथ्यावर पडली होती.
 मतदारसंघात मुस्लीम मतांचे प्रमाण लक्षणीय असून, समाजवादी पार्टीने या मतदारसंघातून लढण्याचे जाहीर केले आहे.
 मनसेचे उमेदवार अभिनेते महेश मांजरेकर किती मतं मिळवतात याकडेही लक्ष लागून राहिलंय.
 समाजवादी पार्टीने जास्तीत जास्त मुस्लीम मतांवर डल्ला मारावा, असा शिवसेनेचा प्रयत्न राहील.
 एकूणच या संमिश्र वस्ती असलेल्या मतदारसंघात कोण किती मतांचे विभाजन करते यावर निवडणूक निकाल ठरणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.