LIVE -निकाल नागपूर

प्रोफाईल मतदारसंघाचं : नागपूर

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 08:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
संध्याकाळी 6: 34 वाजता अपडेट नितीन गडकरी 2 लाख 84 हजार 828 मतांनी विजयी

संध्याकाळी 6:11 वाजताअपडेट नागपूर- 16 फेरीनंतर गडकरी 282124 मतांनी आघाडीवर
संध्याकाळी 5:40 वाजताअपडेट 15 व्या फेरीनंतर नितीन गडकरी 2,52,571 मतांनी आघाडीवर
संध्याकाळी 5 वाजताअपडेट नितीन गडकरी 2 लाख 33 हजार 800 मतांनी आघाडीवर
संध्याकाळी 5 वाजताअपडेट
नितीन गडकरी 1 लाख 36 हजार मतांनी आघाडीवर
सकाळी 9.17 वाजताअपडेट नागपूर - नितीन गडकरी पहिल्या फेरीअखेरीस 24,456 मतांनी आघाडीवर
सकाळी 9:10 वाजताअपडेट
नितीन गडकरी 10 हजार मतांनी आघाडीवर
अपडेट सकाळी 8:33 नागपूरमध्ये 2168 पोस्टल मतं
मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. याच ठिकाणी पाहा क्षणाक्षणाचे लाइव्ह अपडेट आणि सविस्तर निकाल... F5 बटन दाबून किंवा पेज रिफ्रेश करून अपडेट पाहा

मतदारसंघ : नागपूर
मतदान दिनांक : १० एप्रिल
एकूण मतदान : ५२.२० टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – विलास मुत्तेमवार (काँग्रेस)
महायुती – नितीन गडकरी (भाजप)
आप – अंजली दमानिया
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
विलास मुत्तेमवार - काँग्रेस - 3,15,148 मतं - 41.72%
भगवानदास पुरोहित - भाजप - 2,90,749 मतं - 38.49%
माणिकराव वैद्य - बसप – 1,18,741 मतं - 15.72%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 17,38,920
पुरुष : 9,03,688
महिला : 8,35,232

काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 यूपीए-१ मध्ये केंद्रीय राज्यमंत्रिपद तर गेली दोन वर्षे काँग्रेसचे अ. भा. सरचिटणीसपद भूषविले असले, तरी मुत्तेमवार हे स्वत:चा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. त्यांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात नागपूरसाठी काही भरीव काम केले म्हणावे तर तसेही झालेले नाही.
 नागपूरमधील काँग्रेसच्या साऱ्या मातब्बर नेत्यांशी त्यांचे मतभेद आहेत. गेल्या वेळी तर काँग्रेसचे सारे नेते टपून बसलेले असतानाही मुत्तेमवार विजयी झाले.
 केंद्रात अपारंपरिक ऊर्जा हे खाते त्यांनी पाच वर्षे भूषविले, पण या खात्याचा एकही मोठा प्रकल्प मतदारसंघात ते उभारू शकले नाहीत.
 आगामी निवडणुकीत नितीन गडकरी यांच्याशी सामना करायचा असल्याने केंद्रात मंत्रिपद मिळावे ही त्यांची अपेक्षा होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपद तर दूरच राहिले पण काँग्रेस संघटनेतील सरचिटणीसपदही गेले.
 एका अर्थाने काँग्रेस हायकमांडने मुत्तेमवार यांना सूचक संदेश दिला आहे. आगामी निवडणूक लढण्याची त्यांची तयारी आहे.

जातीपातीची समीकरणं
 हिंदू बहुल असलेल्या या मतदार संघात एकूण ६६ % मतदार हिंदू आहेत. त्या पाठोपाठ २०% बौध्द धर्मीय, ११% मुस्लिम, इसाई आणि जैन धर्मीय मिळून २.५ % आणि इतर ०.५% आहेत.
 नागपुरात हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत आणि येथील रहिवाश्यांवर आणि संस्कृतीवर हिंदीचा पगडा आजही बघायला मिळतो.
 नागपुरात मोठ्या संख्येने हिंदी भाषिक आहेत. तसेच दलित आणि मुस्लिम मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आणि या वर्गामुळेच नागपूर हा पारंपरिक पद्धतीने काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.