www.24taas.com, झी मीडिया, न्यू यॉर्क
अमेरिकेचं वृत्तपत्र `द वॉशिंग्टन पोस्ट`ने लिहलं आहे की, भारताला नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान असावा, या वृत्तपत्राने नरेंद्र मोदी यांना सल्ला देखिल देण्याचा प्रयत्न केला आहे.
मोदींनी मोठं - मोठ्या गोष्टी बोलण्यापेक्षा, आपल्या यशासाठी अंमलबजावणीवर लक्ष दिलं पाहिजे, असा सल्ला `द वॉशिंगटन पोस्ट`ने दिला आहे.
वृत्तपत्राच्या संपादकीयमध्ये भाजप आणि मोदी यांच्यातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांकडून होणाऱ्या टीकेला दुर्लक्षित करण्यात आलं आहे, आणि म्हटलंय की मोदींनी आता मुस्लिमांचा विरोध सोडून दिला आहे.
`द वॉशिंगटन पोस्ट` ने ही शंकाही फेटाळून लावली आहे की, मोदी आल्यानंतर लोकशाही संस्था दुबळ्या होतील, अथवा मोदी सत्तेत आल्यानंतर देशात धार्मिक उच्छाद वाढेल. यासाठी भारतीय राजकारणातील संस्कृती अशी हिंसक वृत्ती मोडून काढण्यास सक्षम असल्याचं कारण देण्यात आलं आहे.
ओबामांचा दोस्तीचा हात महत्वाचा
`द वॉशिंगटन पोस्ट` ने बराक ओबामा यांनी मोदींशी दोस्तीसाठी हात पुढे केला ही चांगली बाब आहे, कारण मोदीं अर्थव्यवस्थेला दिशा देण्याच्या पक्षाच्या भूमिकेवर काम करतील.
दोष कमी, गुण जास्त
`द वॉशिंगटन पोस्ट` ने नरेंद्र मोदी यांच्यातील गुण-दोषांची तुलना केली आहे पहिल्यांदा शौचालय आणि मग देवालय, याच्यावरून हे स्पष्ट झालं आहे की, मोदींनी मुस्लिम विरोधी भूमिका सोडून दिली आहे, असं `द वॉशिंगटन पोस्ट` ने म्हटलंय.
मनमोहन सरकारचा प्रभाव संपलाय
`द वॉशिंगटन पोस्ट`ने मोदींनी जादुई आणि कठोर परिश्रम घेणारा नेता म्हटलं आहे, त्यांच्या आश्वासनामुळे भारतात फार मोठ्या बदलाची शक्यता आहे. मागील दशकापासून मनमोहन सिंह सरकार अप्रभावी झाली असल्याचं `द वॉशिंगटन पोस्ट`ने म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.