नारायण राणे देणार राजीनामा, रत्नागिरीत प्रतिक्रिया

काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे मुलगा नीलेश राणे यांचा पराभव दिसू लागल्याने राणे नाराज झालेत. त्यांनी पराभवाची जबाबदारी म्हणून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. तशी माहिती त्यांनी रत्नागिरीत दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 16, 2014, 03:51 PM IST

WWW.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे मुलगा नीलेश राणे यांचा पराभव दिसू लागल्याने राणे नाराज झालेत. त्यांनी पराभवाची जबाबदारी म्हणून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. तशी माहिती त्यांनी रत्नागिरीत दिली.
लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांना कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी घेतला. त्यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठांचे आदेश धुडकावून शिवसेनेला मदत केली. त्यामुळे सेनेचा विजय मानला जात होता. आपली लढाई दहशतवादाविरोधात आहे. शरद पवारांशी नाही. पवारांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून मी राजीनामा दिला, असे प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली.
शरद पवारांनी दीपक केसरकरांना तंबी दिली होती. तरीही कार्यकर्त्यांसाठी आपण बंड केल्याचे सांगितले. तर केसरकरांची राजकीय अस्तित्व संपणार अशी भविष्यवाणी राणे यांनी केली होती. मात्र, शिवसेनेचे विनायक राऊत यांनी सुरुवातीपासून काँग्रसेचे नीलेश राणे यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली. पराभव दिसून लागल्याने राणेंनी राजीनामा देण्याचे ठरविले आहे. हा पराभव राणेंना धक्का देणारा आहे.

निकाल स्थिती
सकाळी 11.55 वाजता अपडेट
10 व्या फेरीनंतर शिवसेनेचे विनायक राऊत 72,000 मतांनी आघाडीवर
सकाळी 11.30 वाजता अपडेट
शिवसेनेचे विनायक राऊत यांची आठव्या फेरीनंतर निर्णायक आघाडी, 62 हजार 182 मतांची आघाडी , काँग्रेसेच्या नीलेश राणेंना धक्का
सकाळी 10 वाजता अपडेट
रत्नागिरी-सिंधुदुर्गातून तिसऱ्या फेरीतही विनायक राऊत 18 हजार 425 मतांनी आघाडीवर
सकाळी 9.23 वाजता अपडेट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरीत 12 वाजता
सकाळी 9.15 वाजता अपडेट
रत्नागिरी-सिंधुदुर्गातून शिवसेनेचे विनायक राऊत पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत आघाडीवर

सकाळी 9.00 वाजता अपडेट
रत्नागिरी- सिंधुदुर्गातून शिवसेनेचे विनायक राऊत 17,000 मतांनी आघाडीवर

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.