www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात जे लुझर्स होते, ते मंत्रिमंडळात सर्वात मोठे गेनर्स ठरले आहेत.
नरेंद्र मोदी यांची `छोटी बहन` आणि अमेठीमध्ये काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या विरोधात पराभूत झालेल्या स्मृती इराणी.
तर अमृतसरमध्ये काँग्रेस उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या विरोधात हरलेले, भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांना मंत्रिमंडळात मोठं स्थान देण्यात आलं आहे.
बीजेपीच्या स्मृती इराणी या राहुल गांधी यांच्याविरोधात 1 लाख 7 हजार 903 मतांनी पराभूत झाल्या आहेत. मात्र त्यांना मानव संसाधन विकास मंत्रालय देण्यात आलं आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस उमेदवार अमरिंदर सिंह यांनी 1 लाख 2 हजार 770 मतांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांना हरवलं आहे.
राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि विश्वासू सहकारी असल्याने नरेंद्र मोदी यांनी त्यांना अर्थ मंत्रालयाचा कार्यभार सोपवला आहे. अरूण जेटली पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.