www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याविरोधातील पेड न्यूज प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात निकाल लागणार आहे. सुप्रीम कोर्टात साडेदहाच्या सुमारास या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
अशोक चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघातील त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. माधव किन्हाळकर यांच्यातील कायदेशीर लढाईत राजकीयदृष्टय़ा हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. २००९ च्या निवडणुकीत भोकरमधून विजयी झालेल्या अशोक चव्हाण यांच्या निवडणूक खर्चासंबंधी डॉ. किन्हाळकर यांनी डिसेंबर २००९ मध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
आयोगाने सुरुवातीपासून हे प्रकरण गांभीर्याने हाताळलं होतं.. त्यानंतर चव्हाणांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली.. तिथं त्यांची याचिका फेटाळण्यात आल्याने चव्हाण यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली. तब्बल २ वर्षे हे प्रकरण तिथं चाललं. अनेकदा सुनावणी लांबली. अखेर आता याप्रकरणी सुप्रीम कोर्टात युक्तीवाद पूर्ण झाला असून निकाल काय लागतो याकडे सा-यांच्या नजरा लागल्यात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.