बारामुल्ला सरकारी शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला

उद्या देशात लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्याचं मतदान होणार आहे. यामध्ये जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघासाठी देखील मतदान होइल. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबाद येथे एका अज्ञात व्यक्तीने पेट्रोल बॉम्ब फेकला. या घटनेने रफियाबादमध्ये तणाव वाढला होता.

Updated: May 6, 2014, 07:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बारामुल्ला
उद्या देशात लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्याचं मतदान होणार आहे. यामध्ये जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघासाठी देखील मतदान होइल. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबाद येथे एका अज्ञात व्यक्तीने पेट्रोल बॉम्ब फेकला. या घटनेने रफियाबादमध्ये तणाव वाढला होता. सुरक्षा रक्षकांनी मात्र सध्या तणाव शांत करत परीस्थिती आपल्या नियंत्रणात घेतली आहे.
निवडणुकीच्या आधीच तणाव निर्माण करण्यासाठी काही समाज कंटकापैकी एकाने, मतदान केंद्र असलेल्या सरकारी कन्या शाळेवर पेट्रोल बॉम्ब टाकला. या कारणाने थोडावेळ परीसरात तणाव निर्माण देखील झाला होता. पण दहशतवाद्यांना हल्ल्यात हवं असलेल यश काही प्राप्त झालं नाही.
दहशतवाद्यांनी मतदान केंद्र जाळण्याचा प्रयत्न केला. पण दहशतवाद्यांच्या मनात असल्याप्रमाणे जास्त मोठे नुकसान झालेलं नाही. हल्ला झाल्यानंतर बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.