उद्धवने पक्ष काढून दाखवावा - राज

निवडणुकीच्या तोंडावरच का, घरगुती वाद उकरले जातात. पण मी एक सांगतो, बाळासाहेबांसाठी मी १०० पावलं पुढं येईन. यावर ठाम आहे. 'करून दाखवलं' ही राजकीय टीका आहे. राजकीय टीका केलेली असताना घरगुती वाद का उकरून काढले जात आहेत.

Updated: Feb 15, 2012, 10:36 PM IST

www.24taas.com, झी २४ तास, न्यूजरूम, मुंबई

 

निवडणुकीच्या तोंडावरच का, घरगुती वाद उकरले जातात. पण मी एक सांगतो, बाळासाहेबांसाठी मी १०० पावलं पुढं येईन. यावर ठाम आहे. 'करून दाखवलं' ही राजकीय टीका  आहे. राजकीय टीका केलेली असताना घरगुती वाद का उकरून काढले जात आहेत. मी स्वत:साठी पक्ष काढला सांगणारे उद्धव यांनी हिंमत असेल तर पक्ष काढून दाखवावा, असं खुलं आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलं आहे.

 

मी का बाहेर पडलो

‘झी २४ तास’वरील ‘नातं आणि राजकारण’ या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. मी  शिवसेनेतून  उद्धवमुळेच बाहेर पडलो आहे. तसेच इतर लोकही त्यामुळेच बाहेर पडले. मला शिवसेनेचा नेता केला तो केवळ प्रचारासाठीच. तर सिंधुदुर्गमध्ये मला पाठवण्याचा यांता हेतू स्वच्छ नव्हता. मला काही गोष्टी पटल्या नाहीत. म्हणून मी बाजूला झालो.  मी वयाच्या ३७व्या बाहेर पडून स्वत:चा पक्ष काढला, उद्धवची तेवढी कुवत आहे का? माझ्याकडे बोट दाखवत असाल तर माझं तुम्हाला खुलं आव्हान असेल, शिवसेनेतून बाहेर पडून उद्धवने  स्वत:चा पक्ष काढून दाखवावा. उद्धव हा काय आहे हे मला चागंलच माहिती आहे. ठाकरे आडनाव आहे म्हणून उद्धवही ओळखला जातो. नाही तर केवळ फोटो काढण्या इतकीच त्याची ओळख असती, असे राज ठाकरे म्हणालेत.

 

प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच

मुंबई मनपातील ४० कोटी हजार गेले कुठे, याचा पुनरउच्चार राज यांनी केला. दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबई शहरात फक्त एकच स्वीमिंग पूल कसा?, मुंबई महापालिकेच्या इतर मैदानांची डागडुजी का केली नाही? फक्त शिवाजी पार्कचीच का केली?, महापालिकेच्या शाळेतील मुलांसाठी सुगंधी दूध दिल्लीतून का मागवलं गेलं?, महाराष्ट्रात दुधाचे इतके उत्पादन होत असताना दिल्लीच का आठवली यांना, ते सुद्धा जास्त किमतीने विकत का घेतले गेले.

 

मी संकुचित वृत्तीचा माणूस नाही 

अहो, मी एवढ्या संकुचित वृत्तीचा, कोत्या मनाचा माणूस नाही.  जर का उद्धवने एखादी गोष्ट चांगली केली तर मी त्याचं देखील कौतुक करेन. पण, त्यांनी काही कामचं केलं नाही. तर काय सांगणार, असाही टोला राज ठाकरे यांनी हाणला.

विधानसभेत खडसे २ -२ तास बोलतात आमचे आमदारांना का बोलू दिले जात नाही.  मला सत्ता न देताही माझ्याकडून इतकी अपेक्षा का केली जाते.

 

किणी प्रकरणातल्या बातम्या उद्धवने पुरवल्या 

किणी प्रकरणातील बातम्या या घरातून पुरवल्या गेल्या होत्या आणि मला बदनाम करण्यात आले होते. या बातम्या तुमच्याच घरातून येतात असे मला अनेक संपादकांनी सांगितले, असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.

 

छगन भुजबळ यांना दुसरा मुद्दा नाही

छगन भुजबळ म्हणाले की, किणी प्रकरण बाहेर काढेल. पण अहो, या छगन भुजबळ यांना काही मुद्दे आहे का?    या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला आहे. ते प्रकरण उगळून का फायदा, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

 

समीर भुजबळांविरुध्द लोकसभेतील निवडणूक मुर्खपणा

समीर भुजबळ यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढा, असे आव्हान छगन भुजबळ यांनी दिल्यानंतर तो काय मुर्खपणा याला काही अर्थ नाही, असे म्हणून या प्रश्नावर राज ठाकरे यांनी भाष्य करण्याचे टाळले.

 

Tags: