राणेंनी केले अजितदादांचे राजकीय ‘वस्त्रहरण’

Updated: Jan 31, 2012, 09:29 PM IST

www.24taas.com,कुडाळ, सिंधुदुर्ग

 

सिंधुदुर्गात दहशतवाद म्हणणाऱ्या पुण्यातील टग्याची टगेगिरी पुण्यात किती दहशतवाद आहे, हे पाहावे, पुण्याच्या टग्याची टगेगिरी सिंधुदुर्गात चालणार नाही, असा कडक इशारा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला.

 

तुम्ही कोण केवळ एक उपमुख्यमंत्री तुम्हांला कोण विचारतंय, सत्ता आमची आहे, मुख्यमंत्री आमचा आहे. उपमुख्यमंत्री जस्ट लाइक कॅबिनेट मिनिस्टर. लग्नात नवऱ्याच्या बाजूला धेडा, अशी गत यांची असल्याची घणाघाती टीका राणे यांनी अजितदादांचं शब्दिक ‘वस्त्रहरण’ केलं.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे वस्त्रहरण करण्यासाठी आज नारायण राणे यांनी कुडाळ येथे जाहीर सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर चांगलाच आसूड ओढला.

 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत काँग्रेसचं निवडणून येणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचं नारायण राणे यांनी सांगितले. काँग्रेस आणि नारायण राणे यांच्यावर काही जण टीका करीत आहेत.  त्यामुळे त्यांना उत्तर देण्यासाठी ही सभा घेतल्याचे राणे यांनी सांगितले.

 

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा कोकणाला बदनाम करण्याचा डाव आहे. कोकणात पर्यटन होऊ नये म्हणून अजितदादा आणि इतर राष्ट्रवादीचे नेते मुद्दामहून अशा प्रकारे षडयंत्र रचत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. या वेळी नारायण राणे यांनी सिंधुदुर्गापेक्षा पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर आहे. याबाबत पुरावेच सादर केले. खुन, दरोडे, चोऱ्या, बलात्कार यात पुणे जिल्हा आघाडीवर असल्याची आकडेवारीच सादर केली.

 

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी कोकणात यावे, कोंबडी वडे खावे आणि जावे, इथे येऊन दहशतवाद असल्याचं म्हणू नये. आकडेवारीवरून असे दिसते की पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. तेथील लोक असुरक्षित आहेत. ट्रक आणून कोथरूड सारख्या भागात दरोडे टाकले जातात. मग, कुठे आहे त्यांचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री का ते यावर नियंत्रण आणू शकत नाही, असा सवालही राणे यांनी यावेळी उपस्थित केला.

 

पुण्यात सिनिअर सिटीझन क्लब

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सिनिअर सिटीझन क्लब काढला आहे. त्यांना तेथे माणसं मिळत नाही म्हणून आता सिंधुदुर्गातून माणसे घेऊन जात असल्याचे नारायण राणे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर तोंडसुख घेताना सांगितले.

 

आर. आर. पाटील यांच्यावर टीका

गृहमंत्री आर. आर. पाटील यांना केवळ नारायण राणे दिसतात. अरे, नक्षलवादी सामान्यांना मारत आहेत, कुठे गेले आर. आर. पाटील?  अशा ते माईकसमोर येतात आणि आम्ही जशास तसे उत्तर देऊ. प्रत्येकवेळी आपलं हेच उत्तर! दरोडे, खून, दहशतवादी हल्ला याचं आपलं एकच उत्तर!  अरे तू करतोस काय? असा सवाल राणे यांनी केला.

माझ्या मुलावर हल्ला करणाऱ्यांना जिल्ह्यातून बाहेर काढण्याचं काम राष्ट्रवादीच्या एका जबाबदार मंत्र्यांने केल्याचा आरोप नारायण राणेंनी आर. आर. पाटील यांचं नाव न घेता केला.

 

[jwplayer mediaid="38936"]

 

[jwplayer mediaid="38957"]

 

 

 

 

Tags: