बहुत झाले बंडोबा, पक्षात खेळखंडोबा!

महापालिका आणि झेडपी निवडणुकांमध्ये बंडाळीला ऊत आला आहे. या बंडाळीमुळे अनेक पक्षांच्या नाकेनऊ आले आहेत.

Updated: Feb 1, 2012, 08:57 PM IST

www.24taas.com, मुंबई

महापालिका आणि झेडपी निवडणुकांमध्ये बंडाळीला ऊत आला आहे. या बंडाळीमुळे अनेक पक्षांच्या नाकेनऊ आले आहेत. राज ठाकरे यांनी बंडोबांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तसेच उद्धव ठाकरेंनीही बंडाळीचा फटका बसू शकतो म्हणून समजूतीचा मार्ग निवडला आहे.

 

सर्व पक्षात बंडखोरीचे लोण पसरले आहे. सध्या भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, काँग्रेस या सर्व पक्षांना बंडखोरांना शांत करण्याची कसरत करावी लागत आहे.

 

बंडाळीची वैशिष्ट्ये -

-          काँग्रेसमध्ये कामत गटाच्या अजित सावंतांची बंडाळी

-          कृपा-निरुपमवर पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप

-          निरुपमविरोधात माजी नगरसेवक विद्यार्थी सिंगही आक्रमक

-          अजित सावंत आणि विद्यार्थी सिंगवर निलंबनाची कारवाई – माणिकराव

-          काँग्रेसच्या 169 पैकी 139 उमेदवारांची पहिली यादी...

-          राष्ट्रवादीच्या 58 जागांपैकी बंडखोरीचे प्रमाण त्यामानाने कमी

-          मुंबई आणि ठाण्यात सर्व पक्षांमध्ये बंडखोरी

-          भाजपातही बंडाळीची लागण,  जुनेजाणते पराग अळवणी पत्नीच्या तिकिटासाठी बंडाच्या पावित्र्यात....

-          राज पुरोहितांच्या सूनेकडूनही अर्ज दाखल, मात्र नंतर मागे घेऊन एक पाऊल मागे

-          राज पुरोहितांकडून चूक कबूल, इतर बंडखोरांनाही बंड मागे घेण्याचा इशारा

-          मनसेच्या नरेंद्र धुरी (वॉर्ड 183) या उमेदवाराचे अपहरण व मारहाण.  मनीष चव्हाण यांच्याकडून मनसेला उमेदवारी.

-          रिपाइंमध्येही नातीगोती आणि गुन्हेगारीला महत्त्व मिळाल्याचा आरोप.

-          यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म वाटल्याने शिवसैनिकांत नाराजी.

-          135 जागांपैकी एकही घोषणा नाही. सोमवारी 60 उमेदवारांचे अर्ज व अखेरच्या दिवशी उर्वरित अर्ज.

-          महापौर श्रद्धा जाधवांविरोधात मंगेश सातमकर नाराज.

 

शिवसेनेत बंडखोरीची लाट

राजा चौघुले (वॉर्ड 122), शाखाप्रमुख शैलेश कोचरेकर (वॉर्ड 198), संजय भरणकर (185), राजू काळे (218), माजी नगरसेविका हेमा शेट्ये, माजी शाखाप्रमुखाची पत्नी निकिता शिरधणकर यांच्यासह 25 हून अधिक जण अपक्ष...

 भाजपातले बंडखोर –

पराग अळवणींची पत्नी ज्योती अळवणींची (वॉर्ड 80) मध्ये बंडखोरी. प्रीती बाणे यांच्याविरोधात बंड. नगरसेवक अरविंद बने (वॉर्ड 211), माजी नगरसेवकाची पत्नी मंगल मगे भानुशाली (वॉर्ड 124), प्रकाश मेहता यांचे पीए सचिन पवार (वॉर्ड 126) यांचाही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज.

 

काँग्रेसमधले बंडखोर

नगरसेविका मीना देसाई (182), दादर काँग्रेसचे सरचिटणीस अश्विन शहा (185), मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी विष्णू गायकवाड (180), दादार काँग्रेसचे पदाधिकारी गणेश कदम (187), नगरसेवक कमलेश यादव यांची पत्नी शांती कमलेश यादव (19), कन्या शलाका यादव (28), नगरसेवक नितीन सलाग्रे यांची पत्नी कोमल नितीन सलाग्रे (77), रवी मोहित (215), काँग्रेस नेते शांताराम ब्रीद (210), रितू तावडे (210), माजी महापौर हरेश्वर पाटलांचा मुलगा दिनेश हरेश्वर पाटील आणि स्थानिक नगरसेवक राजेंद्रप्रसाद चौबे यांची अपक्ष उमेदवारी

 

 राष्ट्रवादीतली बंडखोरी –

खासदार संजय दिना पाटील यांची वहिनी प्रमिला कमलाकर पाटील (109), साहेबराव भिंताडे यांची पत्नी जयश्री भिंताडे (152), सीरिल डिसोझा (44), अर्चना हेमंत म्हात्रे (173) यांच्यासह अनेकांची अपक्ष उमेदवारी.