www.24taas.com, झी मीडिया, वाराणसी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यानंतर आज राहुल गांधी वाराणसीत भव्य रोड शो केला. काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज शेवटच्या दिवशी वाराणसीत आले आहेत आणि याठिकाणी ते शक्तिप्रदर्शन करतायत. राहुल गांधींच्या आजच्या रोड शो आणि सभेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीय.
या रोड शो नंतर राहुल गांधी एक लंका गेट पोहोचले तिथं त्यांनी मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केलं. रोड शोनंतर राहुल चिरईगाव ब्लॉक इथल्या साथवानमध्ये एक निवडणूक सभा घेणार आहेत.
तर दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या वाराणसीमधील रोड शोवरून आता राजकारण सुरू झालंय. आज राहुल गांधींना रोड शो आणि सभेसाठी परवानगी मिळते मात्र नरेंद्र मोदींना गुरुवारी बेनियागंजमध्ये सभा घेण्यास परवानगी का मिळत नाही असा सवाल भाजप नेते अरुण जेटली यांनी विचारलाय. तर भाजपला पराभव समोर दिसत असल्यामुळं असे आरोप करत असल्याचा पलटवार काँग्रेसनं केलाय.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या रोड शो आणि सभेला होणारी गर्दी ही वाराणसीतील असून बाहेरुन आणलेली गर्दी नसल्याचा दावा अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.