राहुल गांधी यांचा आज वाराणसीत रोड शो

नरेंद्र मोदींच्या हिट रोड शोनंतर आज राहुल गांधींचा वाराणसी दौरा होतोय. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं आपलं सर्वात महत्त्वाचं कार्ड वापरलंय.

Updated: May 10, 2014, 11:10 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नरेंद्र मोदींच्या हिट रोड शोनंतर आज राहुल गांधींचा वाराणसी दौरा होतोय. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं आपलं सर्वात महत्त्वाचं कार्ड वापरलंय.
राहुल गांधी आज वाराणसीमध्ये रोड शो सुरू आहे, गोलगट्टा ते लंकापर्यंत हा रोड शो आहे. राहुल गांधी यानंतर काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहेत.
वाराणसीत राहुल गांधी सथवान चौक मैदान, चिराईगावमध्ये इथं प्रचार सभा घेणार आहेत.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी जातीपातीचा मुद्दा उपस्थित केला खरा. मात्र आता त्यांच्याच जातीवरून वाद निर्माण झालाय. काँग्रेसनं ते ओबीसी नसल्याचा दावा केलाय.
तर काँग्रेसच्या काळातच मोदींच्या जातीचा ओबीसीत समावेश झाल्याचा प्रतिदावा भाजपनं केलाय. मात्र यानिमित्तानं जातीच्या राजकारणाचा पुन्हा प्रत्यय आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.