सोनियांनी केलं मोदींचे अभिनंदन

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखेर भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणुकीतल्या विजयाबद्दल अभिनंदन पत्र लिहलंय. काँग्रेसमधल्या सुत्रांनी ही माहिती दिली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 23, 2014, 01:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखेर भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणुकीतल्या विजयाबद्दल अभिनंदन पत्र लिहलंय. काँग्रेसमधल्या सुत्रांनी ही माहिती दिली.
या निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं घवघवीत यश मिळवलंय. एकट्या भाजपानंही 282 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलंय. मात्र याबद्दल सोनिया यांनी मोदींचे आजवर अभिनंदन केलं नव्हतं.
16 तारखेला पराभावानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्येही सोनियांनी मोदींचे नाव न घेता नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. सोनियांच्या त्या पत्रकार परिषदेवर जोरदार टीका झाली. अखेर सोनियांनी पत्र लिहून सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. पण त्यांचे हे पत्र म्हणजे कोरडा राजकीय शिष्टाचार असल्याचं मत राजकीय वर्तुळात व्यक्त केलं जातंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.