सोनियांनी नाही तर पवारांनी दिली `कमकुवत` पंतप्रधानांची साथ

पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे सल्लागार संजय बारू यांनी आपल्या नव्या पुस्तकात पंतप्रधानांविषयी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 12, 2014, 09:35 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे सल्लागार संजय बारू यांनी आपल्या नव्या पुस्तकात पंतप्रधानांविषयी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. मनमोहन सिंग हे कमकुवत पंतप्रधान असल्याची टीका बारू यांनी आपल्या `द अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर - मेकींग अँड अनमेकींग मनमोहन सिंह` या पुस्तकात केलीय.
डीएमकेच्या ए. राजा यांना हटवण्याची मनमोहन सिंह यांची तयारी होती. मात्र, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या हट्टामुळं ते हटवू शकले नाहीत. अर्थतज्ज्ञ सी. रंगराजन यांना अर्थमंत्री करण्याचा आग्रह मनमोहन सिंह यांचा होता. मात्र ते करू शकले नाहीत. मनमोहन सिंह यांनी सोनियांपुढं शरणागती पत्करली होती. कॅबिनेटमधील मंत्री पंतप्रधानांना नव्हे तर यूपीए अध्यक्ष सोनिया गांधींना बांधिल होते, असा गौप्यस्फोटही बारू यांनी आपल्या पुस्तकात केलाय.
बारू हे मनमोहन सिंग यांच्या जवळचे मानले जात होते तसंच दीर्घकाळ ते मनमोहन सिंग यांच्याशी जोडलेले होते. मनमोहन सिंग यांना नेहमीच वाटत होतं की जर सत्तेचे दोन केंद्र असतील तर कठिण परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे त्यांनी सोनिया यांना एकमात्र सत्ताकेंद्र मानलं होतं.
संजय बारू काय म्हटलंय नेमकं या पुस्तकात
* यूपीए - २ दरम्यान मनमोहन सिंह यांनी पक्षानं पूर्णत: साईडलाईन करून टाकलं होतं कारण कॅबिनेटपासून ते पीएमओपर्यंतचे अनेक निर्णय सोनिया गांधीच घेत होत्या.
* मनमोहन सिंह यांचे सोनिया गांधी किंवा यूपीए मंत्र्यांसोबत अनेकदा मतभेद असतं. पण, त्यांनी सोनियांसमोर आत्मसमर्पन केलं होतं.
* २००९ साली पक्षाला मिळालेला विजय हा मनमोहन सिंह यांना आपला विजय वाटत होता.... यावेळी, मंत्रिमंडळ आपल्या पद्धतीनं बनवता येईल असं त्यांना वाटलं होतं पण असं घडलं नाही. सोनियांनी मनमोहन सिंह यांच्याशी चर्चाविनाच प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री बनविलं होतं. तसंच ए. राजा आणि टी. आर. बालू यांनाही मनमोहन सिंग यांच्याविरोधानंतरही मंत्रिपद मिळालं होतं.
* २००४ साली पंतप्रधानपद धुडकावणं ही सोनिया गांधी यांची एक रणनिती होती. सोनिया यांनी सत्तेत नसताणाही सारी सूत्रं आपल्या हाती ठेवली. यामुळे पीएमओमध्ये सोनियांच्या जवळच्या व्यक्तींच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तसंच नॅशनल अॅडवायजरी काऊन्सिलचं निर्माणही समांतर सत्ता बनविण्यासाठीच झालं होतं. मनमोहन सिंग यांनीही सोनियांपुढे हात टेकतं घडलं ते स्वीकार केलं. पंतप्रधानांचं आपल्याच कार्यालयावर नियंत्रण नव्हतं.
* प्रणव मुखर्जी यांनी अर्थसंकल्प तयार करतानाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केली नव्हती. काँग्रेसच्या खासदारांनी नेहमीच सोनियांना खूश करण्याचा प्रयत्न केला.
* यूपीए - १ दरम्यान पीएमओच्या लाचार इमेज निर्माण झाली होती ती प्रमुख सचिव टी. के. नायर यांच्यामुळे. नायर यांच्या कार्यकाळात मनमोहन सिंह यांच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम सुरु झाला होता. त्यानंतर जेव्हा नायर यांना हटविलं गेलं तेव्हा असं वाटलं होतं की पंतप्रधानांची प्रतिमा सुधारेल. पण, नायर यांची जागा पुलक चॅटर्जी यांनी घेतली, त्यामुळे ही शक्यताही फोल ठरली. चॅटर्जी हे सोनिया गांधींचे जवळचे होते.
* मनमोहन सिंग यांना यूपीए-१ च्या कार्यकाळात बऱ्याचदा आपल्या मंत्र्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. ए. के. अॅन्टनी आणि अर्जुन सिंह तर बैठकांमध्ये उघड उघड मनमोहन सिंह यांचा विरोध करत होते.
* परंतु, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मात्र कधीही मनमोहन सिंह यांचा विरोध केला नाही तर बऱ्याचदा ते पंतप्रधानांच्या सोबत उभे राहिलेले दिसले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.