स्टार्सना मतदानापेक्षा ग्लॅमर अधिक महत्वाचे

ज्या स्टार कलाकारांना तरुणाई डोक्यावर घेते त्यांनी आपले पहिले मतदानाचे कर्तव्य पार न पाडता दांडी मारण्याचा निर्णय घेतला. या स्टार्सना ग्लॅमर अधिक महत्तवाचं वाटतंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 22, 2014, 10:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ज्या स्टार कलाकारांना तरुणाई डोक्यावर घेते त्यांनी आपले पहिले मतदानाचे कर्तव्य पार न पाडता दांडी मारण्याचा निर्णय घेतला. या स्टार्सना ग्लॅमर अधिक महत्वाचं वाटतंय.
अमेरिकेत होणा-या 15 व्या IIFA पुरस्कार कार्यक्रमासाठी अनेक बॉलिवूड स्टार्स रविवारी रात्री रवाना झाले. 23 ते 26 दरम्यान होणा-या या कार्यक्रमासाठी सोनाक्षी सिन्हा, सैफ अली खान, रिचा चड्डा, जावेद अख्तर आणि शबाना आझमी हे स्टार्स रवाना झाले.
मुंबईत 24 तारखेला मतदान होणार आहे. या काळात जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणं कर्तव्य असताना या कलाकारांनी एका खासगी कार्यक्रमासाठी अमेरिकेला जाणं पसंत केलंय. त्यामुळे देशाबद्दलची आपली जबाबदारी पूर्ण करण्यापेक्षा पुरस्कार कार्यक्रमातलं ग्लॅमरला अधिक महत्तवाचं वाटतं असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय. मतदानाला दांडी मारणा-या या बॉलिवूड स्टार्सना युवकांनी आपलं रोल मॉडेलं का मानावं असा प्रश्नही यामुळे उपस्थित झालाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.