गुल पनाग आणि किरण खेरमध्ये ट्वीटर युद्ध

चंडिगड मधून एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत असलेल्या गुल पनाग आणि किरण खेर यांच्यात ट्विटर वॉर रंगले आहे !

Updated: Mar 28, 2014, 06:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चंडिगड
चंडिगड मधून एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत असलेल्या गुल पनाग आणि किरण खेर यांच्यात ट्विटर वॉर रंगले आहे ! आपच्या तिकिटावर गुल पनाग उभ्या आहेत, तर भाजपच्या तिकिटावर किरण खेर लढताहेत. गुलनं पहिल्यांदा ट्विट करुन हे युद्ध सुरु केलं.
गुलचा मोदींची प्रशंसा करणारा जुना ट्विट भाजपनं प्रसिद्ध केला, त्याला गुलनं आग-कढईचा पर्याय असेल तर आगीत बराच काळ होरपळल्यानंतर पुन्हा आगीचा पर्याय तुम्ही निवडणार का ? नाही ना ? असं ट्विट करुन उत्तर दिलं. नंतर किरण खेरही @kirronkherbjp या हँडलनं ट्विटरवर दाखल झाल्याचं अनुपम खेर यांनी जाहीर केलं. 
गुल पनागने किरण खेर यांना टोला लगावलाय, गुलने ट्वीट करून म्हटलंय `मला शंका आहे वयाच्या साठीत मी अशी धावपळ करु शकेल का ? सर्वसाधारणपणे हे तर निवृत्तीचे वय असते` असं ट्विट करत किरण खेर यांना डिवचलंय.
गूलच्या या ट्वीटला किरण खेर यांनी `माझे वडिल १०१ वर्षांचे आहेत आणि अजून कार्यरत आहेत. त्यांनी मला विजयाच्या शुभेच्छा दिल्यात. माझ्यासाठी Life starts at 60 !`  असं tweet करत उत्तर दिलं.
हे ट्विटर वार पुढे नेत किरण खेर यांनी `मी मॅरेथॉन रनर नसेलही पण मला माहित आहे, slow and steady wins the race ! मला माझ्या कार्यकर्त्यांमधला जोश आवडतो !` असं सांगत ट्विटरवर युद्ध करण्यात आपण या वयातही कमी नाही हे दाखवून दिलं. अद्याप गुल पनांगनं किरण यांच्या टवीटला पुढे उत्तर दिलं नसलं तरी हे युद्ध पुढेही रंगण्याची चिन्ह आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.