www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आज अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. तर अभिनेते महेश मांजरेकर यांचं नाव मनसेचे लोकसभेचे उमेदवार म्हणून यापूर्वीच जाहीर झालंय. आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर अमोल कोल्हेंनी शिवसेनेत प्रवेश केला. आता हे दोन शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे कलाकार शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
अभिनेते महेश मांजरेकर मनसेच्या तिकीटावर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांच्यासोबतच अमोल कोल्हे यांनाही मनसेनं शिरूर मतदारसंघातून उमेदवारीची ऑफर दिली होती. मात्र महाराष्ट्राला सुसंस्कृत नेतृत्व हवं, असं म्हणत अमोल कोल्हेंनी शिवसेनेत प्रवेश केला आणि राज ठाकरेंना ठेंगा दाखवला.
अमोल कोल्हेंच्या शिवसेना प्रवेशानंतर मात्र आता दोन्ही मराठी पक्षांचे दोन शिवाजी महाराज झालेत. महेश मांजरेकर यांनी `मी शिवाजी राजे भोसले बोलतोय` या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली. तर अमोल कोल्हे यांनी छोट्या पडद्यावर, चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका केलीय. त्यांना अनेक प्रेक्षक शिवाजी महाराज म्हणूनच संबोधतात.
त्यामुळं आता हे दोन शिवाजी महाराजांची भूमिका केलेले कलाकार दोन वेगवेगळ्या पक्षांचा प्रचार करतांना दिसतील.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हि़डिओ