सेनेचं नेतृत्व वाट लावणारं नाही, तर वाट दाखवणारं - कोल्हे

अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी आज अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली. यावेळी बोलतांना डॉ. अमोल कोल्हे यांनी आपण भगव्या कायम मान राखू असं म्हटलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 19, 2014, 12:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी आज अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली. यावेळी बोलतांना डॉ. अमोल कोल्हे यांनी आपण भगव्या कायम मान राखू असं म्हटलंय.
अमोल कोल्हेंना राज ठाकरेंनी मनसेकडून लोकसभेची ऑफर दिली होती. शिरूर मतदार संघातून त्यांना उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र आपल्याला ते नेतृत्व पटलं नसल्यानं आपण ऑफर नाकारली, असं अमोल कोल्हे म्हणाले. मराठी नेतृत्व आक्रमक पण संयमी असावं या शब्दात त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय.
उद्धव ठाकरेंमध्ये आपल्याला ते संयमी नेतृत्व दिसलं आणि ज्या शिवाजी महाराजांचा मी आतापर्यंत अभिनय केलाय त्यांचं कार्य पुढं नेण्यासाठी मला शिवसेनाच योग्य वाटली, असंही कोल्हे म्हणाले. शिवसेनेत वाट लावणारे नाही, वाट दाखवणारे विचार आहेत. मी कायम हे शिवबंधन जपील असं आश्वासनही अमोल कोल्हे यांनी दिलं
लोकसभा निवडणुकीदरम्यान आता एनडीएचा प्रचार करणार असल्याचं कोल्हे यांनी जाहीर केलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.