मोदींच्या हत्येसाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक

उत्तर प्रदेश एटीएसनं बुधवारी रात्री गोरखपूर रेल्वे स्टेशनजवळून दोन संशयित मानवी बॉम्बला अटक करण्यात आलीय. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय. तसंच दहशतवाद्यांजवळून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही आढळलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 27, 2014, 04:57 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, गोरखपूर
उत्तर प्रदेश एटीएसनं बुधवारी रात्री गोरखपूर रेल्वे स्टेशनजवळून दोन संशयित मानवी बॉम्बला अटक करण्यात आलीय. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय. तसंच दहशतवाद्यांजवळून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही आढळलं.
हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानच्या मुल्तानचे राहणारे असल्याचं सांगण्यात येतंय. एटीएसचे आयडी राजीव सभरवाल यांना दहशतवाद्यांच्या अटकेबाबत माहिती दिलीय. अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला असून त्यांनी सांगितलं की इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या तहसीन अख्तरला अटक झाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं माहिती दिली होती, त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन दहशतवादी देशात रामपूर सारखे हल्ले करण्याच्या बेतात होते. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी इंडियन मुजाहिद्दीनमध्ये हे दोन सहभागी झाले होते. या दोघांची नावं बरकत आणि मुजम्मिल असल्याचं एका चॅनेलनं म्हटलंय. पोलिसांनी सांगितलं की हे दोन्ही दहशतवादी निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान प्रमुख नेत्यांची हत्या करणार होते. नरेंद्र मोदी त्यांचे प्रमुख टार्गेट होते.
या दोन्ही दहशतवाद्यांना लखनऊच्यो एटीएस कार्यालयात नेण्यात आलंय. दोघांविषयीची माहिती तहसीन अख्तर उर्फ मोनी यांच्या चौकशीनंतर मिळाली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.