www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय संघाचा धडकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने लोकसभा निवडणूक लढविण्याचा वृत्ताचा इन्कार केला आहे. मला लोकसभा निवडणूक लढविण्याची ऑफर मिळाली होती, पण मी त्याचा स्वीकार केला नसल्याचे वीरेंद्र सेहवाग याने स्पष्ट केले.
सेहवागने दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने १० दिवसांपूर्वी दक्षिण किंवा पश्चिम दिल्लीतून निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती. पण मला एक दोन आयपीएल अजून खेळायच्या आहे, त्यामुळे मी त्या ऑफरला नकार दिल्याचे सेहवागने सांगितले.
यापूर्वीच्या बातमीनुसार काँग्रेस सेहवागला लोकसभा उमेदवार निश्चित करण्याची इच्छूक आहे. सेहवागची बहिण दक्षिण दिल्लीतील दक्षिणपुरी एक्सटेन्शनहून काँग्रेसची नगरसेविका आहे.
भारतीय संघाचा तडाकेबाज फलंदाज गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियामधून बाहेर आहे. यावर्षी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सनेही त्याला खरेदी केले नाही.
दक्षिण दिल्लीत मोठ्या प्रमाणात ग्रामीण मतदार आहेत. तसेच या ठिकाणी जाट आणि गुर्जरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे काँग्रेस सेहवागला या ठिकाणाहून उमेदवारी देण्यास इच्छूक होती. या ठिकाणी सेहवाग खूप लोकप्रिय आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.