योगेश घोलप बंडखोरी करणार? उमेदवारी अर्ज दाखल

शिर्डीमध्ये बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिक्षा झालेले बबनराव घोलप यांचे पूत्र योगेश घोलप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ते बंडखोरी करण्याची शक्यताय. तर शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 26, 2014, 06:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, शिर्डी
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारीबाबत गोंधळ निर्माण झालाय. बबन घोलप यांची उमेदवारी रद्द झाल्यामुळं त्यांच्याजागी सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी बबन घोलप यांचा मुलगा योगेश घोलप यांनीही शिवसेनेचा एबी फॉर्म वापरत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळं आता शिवसेनेचा नक्की उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झालाय.
शिर्डीमधून शिवसेनेचा नक्की उमेदवार कोण.. सदाशिव लोखंडे की योगेश घोलप. बबन घोलप यांना शिक्षा झाल्यामुळे पक्षा सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानुसार त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्याआधीच योगेश घोलप यांनी बबन घोलप यांना मिळालेला एबी फॉर्म वापरत अर्ज दाखल करून टाकला. त्यामुळे गोंधळ निर्माण झालाय. मात्र शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे हेच आहेत. योगेश घोलप हे उमेदवार नाहीत असं पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी झी मीडियाशी फोनवरून बोलताना स्पष्ट केलंय.
अर्ज दाखल केल्यावर होणाऱ्या छाननी प्रक्रियेत योगेश घोलप यांचा अर्ज बाद होईलच. पण त्याआधी हे दोन अर्ज शिवसेनेच्या नावावर दाखल झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती हे खरं..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.