ब्रिगेडिअर. हेमंत महाजन
आसामसह ईशान्य राज्यांमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा मुद्दा संसदेत १८ ऑगस्टला गाजला. दोन्ही सभागृहांनी प्रश्नो्त्तराचा तास स्थगित करून या विषयावर केलेल्या चर्चेअंती, ईशान्येकडील राज्यांतील विद्यार्थ्यांना अफवांच्या माध्यमातून घाबरविणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहेत, असा ठराव राज्यसभेने मंजूर केला. विद्यार्थ्यांनी त्या-त्या शहरांमध्ये परतावे, असा विश्वायस देण्यात आला. यामुळे ईशान्य राज्यांमधील विद्यार्थ्यांचे परत जाणे काही थांबलेले नाही.
पुण्यात, मुंबईतील ईशान्य भारतीयांना धोका असल्याच्या अफवांचे पीक आले आणि या नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मनातल्या धास्तीने या मंडळींनी ‘गड्या आपला गाव बरा’ म्हणत परतीची वाट धरली आहे . गुवाहाटी एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी जास्तच गर्दी दिसून आली. आसाम, पूर्वांचल भागात जाण्यासाठी मुंबईहून गुवाहाटी एक्स्प्रेस , कामाक्ष्य एक्स्प्रेस या गाड्या सुटतात. आसामनंतर बेंगळुरू, पुण्यातील स्थितीमुळे मुंबईतीलही आसामी आणि ईशान्य भारतीय प्रचंड धास्तावल्याचे चित्र होते. परतणाऱ्यांपैकी बरेचसे गरीब स्तरातील आहेत . भीतीमुळे घर गाठण्यासाठी या मंडळींची लगबग सुरू होती. नोकरीधंदा पुन्हा मिळेल, पण घरच्यांची काळजी महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया बहुतेकजण व्यक्त करतात. मुंबईतील झुंडगिरी सुरूच असून भांडुपमध्ये शुक्रवारी पहाटे तरुणांच्या गटाने बेस्ट बसच्या कंडक्टरला मारहाण केली. भांडुपमधील जंगलमंगल रोडवरून ही बस जात होती. बसमध्ये बेस्टचेच कर्मचारी होते. त्यावेळी सऊद कुरेशी, सोहिल मोमीन व अक्श कौरी या तरुणांनी बसचे कंडक्टर महादेव राणे यांना मारहाण केली .
सोशल मीडियावर स्वार होण्याचे मार्ग
सरकारला सोशल मीडिया सापासारखा भासतो आहे. मुंबईतील आझाद मैदानावरील दंगलीपासून ते ईशान्येकडील विद्यार्थ्यांना धमकावण्यापर्यंत साऱ्या गोष्टींची जबाबदारी सोशल मीडियावर टाकून ‘जबाबदार` यंत्रणा हात झटकत आहे. सरकारी भाषेत तत्काळ म्हणजे सहा महिने… सरकारी ‘तत्काळ’ सहा महिन्यांचा असेल तर सोशल मीडियासारख्या सतत बदलत जाणाऱ्या प्रवाहात सरकारी यंत्रणा तग धरणे शक्य नाही. मुंबईतील आझाद मैदानावर काही उत्स्फूर्तपणे ‘रझा अकादमी’ची जनता जमली नव्हती. पारंपरिक पद्धतीने जसे आवाहन अकादमीने केले तसेच सोशल मीडियातूनही केले. देशातील दहा कोटी लोक बदलले आहेत. ते ऑनलाइन असतात. त्यांच्याकडे माहिती मिळविण्याची आणि पसरविण्याची साधने आहेत. खातरजमा करणारी कोणतीच यंत्रणा अस्तित्वात नसल्याने, हे लोक पसरवतात ती ‘माहिती’ असे सध्याचे स्वरूप आहे. माहिती देण्यासाठी, खातरजमा करण्यासाठी, तिला विधायक दिशा देण्यासाठी आणि सामाजिक उपयोगासाठी स्वत:ची यंत्रणा विकसित करणे किंवा अस्तित्वातील यंत्रणांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणे, हे सोशल मीडियावर स्वार होण्याचे मार्ग आहेत. दोन दिवसांच्या शांततेनंतर आसाममध्ये रविवारपासून पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटनांना सुरवात झाली आहे.
अल्पसंख्याक आता बहुसंख्याक
अत्याचाराच्या घटनेमुळे हादरलेला आसाम सावरत असताना आता बोडो भूमीत हिंसाचाराचे लोण पसरले आहे. आताचा वाद ‘स्थानिक’ विरुद्ध ‘परके’ असा आहे. धुब्री जिल्ह्यातून गेली अनेक वर्षे अल्पसंख्याक समाजातील (आता ते बहुसंख्याक झाले आहेत) लोक कोक्राझार जिल्ह्यात येत आहेत. त्याचा स्थानिकांना राग आहे आणि त्यातून संघर्षाची ठिणगी पडली. स्थानिक विरुद्ध परके हा वाद आसामला नवा नाही. रोजगाराच्या कमी संधी आणि आहे त्या संधींसाठीच्या संघर्षात नवे वाटेकरी आल्यावर कोण शांत बसणार? अशी स्थिती निर्माण झाल्याने तिचे पर्यवसान हिंसाचारात होते. स्थानिकांच्या वेदना जाणून घेऊन त्यावर मार्ग काढणे आवश्योक आहे. केवळ बांगलादेशीं घुसखोरांना परत पाठवून या समस्येवर समाधानकारक तोडगा काढणे हाच शांततेचा खरा मार्ग ठरेल. आज तेथे १५ टक्के असलेली मुसलमान लोकसंख्या ३१ टक्क्यांवर गेली आहे तर मुळचा बोडो आदिवासी समाज अल्पसंख्यांक झाला आहे. सरकार मूग गिळून गप्प बसून आहे कारण हे निर्वासित म्हणजेच काँग्रेसची मतपेढी आहे. देशाचे पंतप्रधान केंद्रात आसामचे प्रतिनिधीत्व करतात. घटना आसाममधील कोक्राझार, घुब्री या भारताचे `चिकन नेक` म्हणविल्या जाणार्यान बांगलादेश आणि भूतान यांच्या सीमेजवळील चिंचोळ्य़ा आसामच्या जिल्ह्यात घडल्या आ