मुंबई : अनेक पुरूष असं म्हणतात की महिलांना समजणं कठीन आहे. महिलांना सांभाळण्यासाठी धैर्याची गरज असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला १० गोष्टी सांगणार आहोत ज्या महिलांना नाही सांगितल्या पाहिजे.
१. कोणत्याही मुलीला जर तुम्ही डेट करत असाल तर सुरुवातीलाच तिला प्रपोज करु नका. जर तिही तुमच्याबाबत सकारात्मक असेल तर ती तुम्हाला सोडून जाणार नाही.
२. जर तुमचं आधीही अफेअर होतं तर ते तुमच्या गर्लफ्रेंडला लगेचच सांगू नका. महिला या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. पण जर त्यांना ही गोष्ट तुम्ही सांगितली तर त्यांना संबंधाबाबतीत असूरक्षित वाटतं.
३. शारिरीक संबंधानंतर महिलांना कधीही थँक्यू म्हणू नका. यामुळे तुमचे संबंध बिघडतील. महिलांना असं वाटतं की ते फक्त शारिरीक संबंधापूरतीच मर्यादित आहे.
४. महिला या आपल्या शरिराबाबतीत कधीच खूश नसतात. तुम्ही जरी म्हटलं जशी आहेस तशी पंसद आहे तरी ते त्याने संतूष्ठ होत नाही. महिला जाड असली आणि तिने याबाबतीत तुम्हाला विचारलं तरी हे सत्य तुम्ही कधीच स्वीकारू नका.
५. मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींविषयी कधीच वाईट बोलू नका. त्यांना हे कधीच आवडत नाही.
६. महिलेला तुमच्यावर रागावली असेल तर तिला रागावली आहे का असं विचारू नका. कारण त्याचं उत्तर नाहीच असेल पण तुम्ही काहीतरी चूक केली असेल तर तिला राग आलेलाच असतो. ती होणार नाही याची काळजी घ्या.
७. महिलेच्या पुरुष मित्रांविषयी कधीच वाईट बोलू नका कारण त्यामुळे तुम्हाला जळण होतं आहे असं त्यांना वाटेल. महिलेच्या मैत्रींची स्तूतीही करू नका. कारण तिला वाटेल की तुम्हाला तिच्या मैत्रींनीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे.
८. महिलेसोबत तुमचे मतभेद झाले तर त्यावर तिच्यासोबत वाद न घालता शांत रहा. तिला ती गोष्ट नंतर समजून येईल.
९. महिलेच्या कपड्यांविषयी कधीही आवडला नाही किंवा खास नाही असं म्हणू नका. खासकरून तेव्हा जेव्हा तिच्या इतर मित्रांना तो ड्रेस आवडला असेल.
१०. तुम्हाला शॉपिंग करायला जरी आवडत नसेल तरी महिलेला शॉपिंगसाठी नाही म्हणू नका. त्यांच्यासोबत शॉपिंगला जा.