अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

सध्या व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्या-पिण्यामुळे अॅसिडीटीची समस्या अनेकांना होते. तेलकट पदार्थ तसेच मसालेदार पदार्थांमुळे पोटात गॅस निर्माण होतो. अॅसिडीटीमुळे पोटात दुखणे, छातीत जळजळणे तसेच अनेकदा डोकेदुखीचीही समस्या उद्भवते. मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही अॅसिडीटीपासून सुटका मिळवू शकता

Updated: Jan 5, 2016, 10:43 AM IST
अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय title=

नवी दिल्ली : सध्या व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्या-पिण्यामुळे अॅसिडीटीची समस्या अनेकांना होते. तेलकट पदार्थ तसेच मसालेदार पदार्थांमुळे पोटात गॅस निर्माण होतो. अॅसिडीटीमुळे पोटात दुखणे, छातीत जळजळणे तसेच अनेकदा डोकेदुखीचीही समस्या उद्भवते. मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही अॅसिडीटीपासून सुटका मिळवू शकता

लसूण, जिरे आणि धने एकत्र पाण्यात उकळून त्याचा काढा प्यायलायस अॅसिडीटीची समस्या दूर होते. आल्यामुळे पोटात गॅस धरत नाही. जेवणानंतर आल्याचा एक तुकडा चावून खाल्ल्याने गॅसचा त्रास होत नाही. याव्यतिरिक्त पुदीनावर गॅसवर रामबाण उपाय आहे. पुदीन्याच्या पानांना उकळून मधासोबत प्यायल्याने गॅसची समस्या दूर होते. 

अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी हे आहेत १० उपाय
केळे
तुळस
थंड दूध
बडिशोप
जिरे
लवंग
वेलची
पुदीना
आले
आवळा