उत्तम आरोग्यासाठी या आहेत १० टिप्स

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात माणसांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नाहीये. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतोय. अनेक भयंकर आजार डोके वर काढतात. आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्यमान बिघडत चालले आहे. व्यस्त कामकाजातून अवघा काही वेळ आरोग्यसाठी दिलात तर तुमचे आरोग्य नक्कीच उत्तम आणि निरोगी राहील

Updated: Dec 26, 2015, 02:53 PM IST
उत्तम आरोग्यासाठी या आहेत १० टिप्स title=

मुंबई : हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात माणसांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नाहीये. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतोय. अनेक भयंकर आजार डोके वर काढतात. आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्यमान बिघडत चालले आहे. व्यस्त कामकाजातून अवघा काही वेळ आरोग्यसाठी दिलात तर तुमचे आरोग्य नक्कीच उत्तम आणि निरोगी राहील

उत्तम आरोग्यासाठी या आहेत १० टिप्स

१. दररोज न चुकता ३० मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायाला जा . 
२. दररोज कोणतेही एकतरी फळ खावे. (खास करून सफरचंद,संत्रे,केळे,पपई,सीताफळ,आवळा यापैकी एखादे)
३. दररोज सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून प्या.
४. प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा.
५. कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा वापर करून केलेले घन / द्रव पदार्थ खाणे टाळा.  
६. दुपारचे व रात्रीच्या जेवणाची सुरुवात सॅलेडने करा.  
७. दिवसातून दोन वेळा ३ ते ५ मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा प्रघात ठेवा.
८. रात्री शांत झोप लागण्यासाठी ,झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न  व्हावे यासाठी दोन मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या.
९. रात्री झोपण्यापूर्वी अर्धी मूठ आक्रोड खा.
१०. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या. (दिवसातून किमान ३ लीटर)