सर्दी-खोकल्याला ठेवा लांब...

Updated: Oct 28, 2014, 03:33 PM IST
सर्दी-खोकल्याला ठेवा लांब... title=

मुंबई : हिवाळा सुरू झाला असून अनेक आजार सुद्धा सोबत घेऊन  येतो. आजकाल वातावरणात  जर  जरी बदल झाल की, सर्दी खोकला हे आजार होतात. सर्दी-खोकला म्हटलं तर साधा... म्हटलं तर हैराण करून टाकणारा आजार...  

याच आजारापासून सुटका कशी करून घेता येईल... त्यावर कोणते घरगुती उपाय आहे... जाणून घेऊयात..

सर्दी आणि खोकल्यावर घरगुती उपाय

1. थोडे आले, 1 चमच्या अझवायन, 5 लंवग, 3 काळी मिरची, 1 चमच्या मैथी, तुळशी आणि पुदीनाची पाने 10 हे सर्व मिश्रण एकत्र करून याचा काढा बनवा. या काढ्यामुळे सर्दीपासून आराम मिळेल.

2. मनुक्याचे वाटण करून त्याची पेस्ट करा. त्यात साखर टाकून उकळून थंड करून ठेवा. दररोज रात्री झोपण्याच्या आधी एक चमच घेतल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो.    

3.आल्याचा एका तुकड्याचा काढा 20 मिली ते 30 मिली दिवसातून तीन वेळा घेतल्यान सर्दीपासून आराम मिळतो.

4. सर्दीमुळे श्वास घेता येत नसेल तर, दालचीनी, काळी मिरची, इलायची आणि जिरे याची पूड एका सुती कपड्यात बांधा... आणि त्याला नाकासमोर धरून त्यासा वास घ्या. त्यामुळे तुम्हाला शिंक येऊन तुमचं कोंदलेला श्वासोच्छवास सुरळीत सुरू होईल.  

 5. 10 ग्राम लसूण, 1 कप दुधात 1/2 कप होईपर्यंत उकळवा. त्यानंतर हे थंड झाल्यानंतर संध्याकाळी झोपण्याच्या आधी किंवा नाश्त्याच्या आधी घेतले पाहिजे.

6. तुळशी ही सर्दीवर रामबाण उपाय आहे. त्यासाठी तुळशीचे पाने चाऊन खा किंवा पाण्यामध्ये उखळून त्याचा काढा बनवून प्यायल्याने फायदा होतो.

7. सर्दीमुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल तर काळी मिरची जाळून त्याच्या धुराचा वास घेतल्याने श्वास घेता येतो.

8. भेंडीचे 50 मिली काढा दिवसातून तीन वेळा घेतल्याने गळ्याची खराश आणि कोरडा खोकलापासून आराम मिळतो.

9. खजूर दुधासोबत घेतल्याने थंडीपासून सुरक्षा होते.

10. एका ग्लासात गरम पाणीमध्ये चिमटभर मीठ, सोडा एकत्र करून दिवसातून दोन वेळा झोपण्याच्या आधी गुळण्या केल्यानं घशाला आराम मिळतो.

11. हळत आणि सुनठचे चूर्णचा लेप बनवून कपाळावर लावा.

12. एका ग्लासात गरम पाण्यात लिंबूचा रससोबत एक चमचा मध एकत्र करून प्या. त्यामुळे शरीरातील प्रतिरोधक क्षमता वाढते आणि सर्दी खोकला होत नाही.

13. 1 चमचा कांद्याचा रस आणि मध दोन्ही समान मात्रामध्ये दिवसातून तीन वेळा घ्या.

14. मधाबरोबर आलेचे सेवन सकाळ संध्याकाळ याचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.

15. गरम दुधमध्ये एक चमचा हळद टाकून पाणी प्यायल्याने कफ आणि सर्दी पासून आराम मिळतो.

 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.