४ गोष्टींमुळे महिला पुरुषांवर घेतात संशय

पती-पत्नीचे नात्यांमध्ये विश्वास हा महत्त्वाचा भाग आहे. एकमेकांवर विश्वास नसल्यास दोघांमधील संबंध कधीच अधिक काळ टिकत नाही. पण काही लोकांना संशय घेण्याची सवय असते. जसे पुरूष महिलांवर संशय घेतात तसं महिलाही पुरुषांवर संशय घेतात. 

Updated: Aug 1, 2016, 10:54 PM IST
४ गोष्टींमुळे महिला पुरुषांवर घेतात संशय title=

मुंबई : पती-पत्नीचे नात्यांमध्ये विश्वास हा महत्त्वाचा भाग आहे. एकमेकांवर विश्वास नसल्यास दोघांमधील संबंध कधीच अधिक काळ टिकत नाही. पण काही लोकांना संशय घेण्याची सवय असते. जसे पुरूष महिलांवर संशय घेतात तसं महिलाही पुरुषांवर संशय घेतात.

या ४ गोष्टींमुळे महिला पुरुषांवर घेतात संशय :

१. मेकअप करुन बाहेर जाणे : जर पुरुष खूप चांगल्या प्रकारे तयार होऊन, परफ्यूम लाऊन बाहेर जात असतील तर महिलांना त्यांच्याबद्दल संशय येऊ शकतो.

२. मोबाईलचा अधिक वापर : मोबाईलवर किंवा व्हॉट्सअॅपवर अधिक वेळ घालवल्याने आणि तो दुसऱ्याच्या हातात न देणे यामुळे पत्नीच्या मनात पतीबद्दल शंका निर्माण होते. फोन आल्यावर पत्नीसमोर न बोलणे यामुळे नात्यातमध्ये कटुता निर्माण होते.

३. वेळेत घरी न येणे : ऑफिस संपल्यानंतरही वेळेत घरी न येणारे पुरुषही आपल्या पत्नीच्या शंकेचे बळी ठरू शकतात. यामुळे महिलांना वाटते की एवढा उशीर का होतो. 

४. पिकनिकला जाणे : जेव्हा तुम्ही पिकनिकला जात असाल तेव्हा पत्नीमध्ये संशय निर्माण होतो. ती देखील येण्याचा आग्रह धरते. त्यामुळे विश्वास निर्माण होते अधिक महत्त्वाचे असते.