मुंबई : लसून मध्ये अनेक औषधीय गुण असतात. लसून हा आरोग्यासाठी देखील उत्तम आहे. लसूनमध्ये विटामीन, प्रोटीन, खनिज, आयरन, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतं.
१. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लसून खूपच लाभदायक आहे. रोज दोन पाकळ्या व्यवस्थित भाजून मग जीरे आणि काळं मीठ यांच्यात एकत्र करुन त्याचं चूर्ण बनवून घ्या. नियमित रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत याचं सेवन केल्याने फायदा होतो.
२. लसून हा बॅक्टेरिअल आणि व्हायरल इंफेक्शन रोखण्यासाठी देखील खूप लाभदायक आहे. अनेक इंफेक्शन पासून लसून बचाव करतो.
३. जर कान दुखत असेल तर २ थेंब गरम लसूनचं तेल कानात टाका. २ वेळा नियमित ५ दिवस असं केल्याने कान दुखणे बंद होते.
४. सर्दी दूर करण्यासाठी लसून खूप गुणकारी आहे. लसूनमध्ये रोगप्रतिकारक आहे.
५. ज्याना हृदयरोग संबंधित विकार आहेत त्यांच्यासाठी लसून फायदेशीर आहे.