www.24taas.com, लंडन
‘पार्किन्सन’ या रोगावर दिलं जाणाऱ्या औषधाचा आणखी एक फायदा नुकताच समोर आलाय. हे औषध वृद्धांमध्ये निर्णय क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं, असं नुकतचं एका संशोधनातून सिद्ध झालंय. ब्रिटनच्या काही संशोधकांनी हा शोध लावला आहे.
‘वेलकम ट्रस्ट सेन्टर फॉर न्यूरोइमेजिंग’च्या एका अभ्यास पत्रिकेत हे अध्ययन प्रकाशित करण्यात आलंय. त्या पत्रिकेत ७० वर्षीय वृद्धांच्या मेंदूच्या कार्यप्रणालीमध्ये होणाऱ्या बदलांचीही नोंद करण्यात आली आहे. अखेर वृद्ध निर्णय घेण्यामध्ये तरूणांच्या तुलनेत मागे का राहतात, हे या शोधातून स्पष्ट करण्यात आलंय.
आपल्या डोक्यात प्रथम कल्पना येते आणि मग ती एका निर्णयामध्ये रूपांतरीत होते. निर्णय घेण्याच्या प्रक्रीयेत या भावनेचं पूर्वानुमान करण गरजेचं असतं’ अस `सायन्स डेली’ या वृत्तपत्रानं म्हटलंय. हा शोध सिद्ध करण्यासाठी त्यांनी काही वृद्धांवर निर्णय घेण्याची क्षमता वाढवणाऱ्या औषधांचा वापर करून उपचार केले. त्यानंतर असं लक्षात आलं, की या वृद्धांची निर्णयक्षमता २० वर्षांच्या बरोबरीनं वाढली होती.
या प्रयोगात जुगार खेळणाऱ्या वृद्धांचाही अभ्यास करण्यात आला. या वृद्धांनी जुगारामध्ये चांगलीच प्रगती केलेली दिसली. पटकन आणि योग्य निर्णय घेतल्यानं त्यांना चांगलाच फायदा झालेला दिसून आला.