मुंबई: डेंगूचा ताप हा एक व्हायरल एडीस इजिप्ती डासांनी पसरणारं संक्रमण आहे. असा ताप आला असता लगेच उपचार न केल्याने रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते. यासाठी डेंग्यूचा उपचार वेळेवर करणं गरजेचं आहे. डेंग्यूच्या तापाने शरीरावर रक्ताचे डाग आणि डेंग्यू आघात सिंड्रोम सारखे लक्षण निर्माण होऊ शकतात. यामुळे फुप्फुस, यकृत, आणि हृदयाला धोका निर्माण होतो.
काय आहेत डेंग्यूच्या तापाची लक्षण -
- पोटात दुखणे
- नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्तस्त्राव होणे
- रक्ताची किंवा सुकी उलटी होणे
- भूक कमी होणे
- थकवा येणे
- सांधे किंवा मांसपेशी दुखणे
डेंगू आघाताचे सिंड्रोम-
डेंगू आघात सिंड्रोममुळे त्वचेवर रक्क्ताचे छोटे डाग दिसतात, आणि त्वचेच्याखाली रक्ताचे मोठे डाग दिसू शकतात.
- ब्लड प्रेशर कमी होते
- श्वास घेताना त्रास होतो
- थंड आणि चिकट त्वचा
- तोंड कोरडे पडते
- अस्वस्थता जाणवते