अँटीबॅक्टेरिअल साबणाने हात धूत आहात...तर सावधान!

Updated: Aug 21, 2014, 08:27 PM IST
अँटीबॅक्टेरिअल साबणाने हात धूत आहात...तर सावधान! title=

न्यूयॉर्क : जर तुम्ही अॅंटीबॅक्टेरियल साबणाने हात धुतात तर थोडं सावधान रहा कारण यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. याचं तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण एका परिक्षणात हे उघड झाले आहे.

अँटीबॅक्टेरियल साबणात काही असे रसायने असतात जे गर्भात वाढत असणाऱ्य़ा नवजात मुलाच्या शारीरिक विकासावर  परिणाम करतात.

'ट्राइक्लोसन' नामक अँटीबॅक्टेरियल एजंट साबण, कॉस्मेटिक्स, टूथपेस्ट आणि काही क्रीमसहीत हजारों वस्तूमध्ये आढळतात. ट्राइक्लोसनचा प्रभावाचा आढावा सध्या यूएस फूड अॅंड ड्रग एसोसिएशन (एफडीए) घेत आहे. संशोधकांच्या मते ट्राइक्लोसन आरोग्य संबंधीत समस्या निर्माण करू शकतात.

अमेरिकेच्या सेंट फ्रांसिस्कोमध्ये स्थित कॅलिफोर्निया विद्यापीठातील मेडिसिनचे प्राध्यापक पॉल ब्लॅकने म्हटलं, 'अँटीबॅक्टेरियल साबण वापरल्याने अनेक प्रकारचा धोका असू शकतो. आमच्या अभ्यासात ही गोष्ट समोर आली की लोक आपल्या कामाच्या ठिकाणी आणि घरी या रसायनाचा जास्त वापर करतात.' ब्लॅक ट्राइक्लोसन रसायन नसलेला साबणाचा वापर करण्याचा सल्ला देतात.

 

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.