मेलबर्न : तुम्हाला हे जाणून थोडं आश्चर्य होईल की संत्री खाल्ल्यानं तुमच्या मुलांना अॅलर्जी (अॅनाफायलॅक्सिस) होऊ शकते... ही अॅलर्जी त्यांच्या आरोग्यासाठी खूपच धोकादायक ठरू शकते.
मेलबर्नच्या पेन्सिलवानिया या भागातील एका लहान मुलाला या अॅलर्जीची लागण झाल्याचं आढळून आलंय. अॅनाफायलॅक्सिस अॅलर्जीचे प्रकारही खूप गंभीर आहेत. यांमुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. त्वचेला खाज येणं, गळ्याला सूज येणं, रक्तदाब कमी होणे ही या अॅलर्जीची लक्षणं आहेत. किडा चावल्याने, काही गोळ्या घेतल्याने किंवा काही पदार्थ खाल्ल्याने अशी लक्षणे दिसू लागतात.
‘अमेरिका कॉलेज ऑफ अॅलर्जी’ आणि ‘अस्थमा अँन्ड इम्युनोलॉजी’चे सदस्य व अॅलर्जी विशेषतज्ज्ञ सिगरिद दा वेगा यांच्या म्हणण्यानुसार, संत्री खाल्ल्यानंतर एका अडीच वर्षाचा मुलीला अॅनाफायलॅक्सिस अॅलर्जीची लागण झाल्याचं आढळून आलंय. अचानक तिच्या ओठांना गालाला सूज येऊन तिला श्वासोच्छवास घेण्यात त्रास जाणवू लागला. त्यामुळे, तिला तत्काळ हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. तिथं तिच्यावर उपचार करण्यात आले.
हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर तब्बल ४८ तासांनी तिची परिस्थिती पूर्वरत झाली. वैद्यकीय अहवालानुसार, संबंधित मुलीला दम्याचा त्रास आहे. त्याचे योग्य निदान अजून झालेले नाही. अॅनाफायलॅक्सिस अॅलर्जी झाल्यानंतर दम्याचं निदान होणं कठीण होऊन जातं, असं मत दा वेगा यांनी व्यक्त केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.