डेंग्यूपासून मुक्ती मिळण्यासाठी भरपूर पाणी प्या, आराम करा

राज्यात डेंग्यूने धुमाकूळ माजवला आहे. अनेकांचे बळी घेणाऱ्या डेंग्यूने मुंबईकर हैराण झाले आहेत. डेंग्यूवर उपचार नाहीच. पपयाच्या पानांचा रस प्या. खजूर खा. बरा होईल, अशा वावड्यांमुळे गोंधळाचे वातावरण आहे. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून भरपूर पाणी प्या आणि आराम करा. मग तुमचे शरीरच डेंग्यूवर उपचार करेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Updated: Nov 7, 2014, 07:58 AM IST
डेंग्यूपासून मुक्ती मिळण्यासाठी भरपूर पाणी प्या, आराम करा

मुंबई : राज्यात डेंग्यूने धुमाकूळ माजवला आहे. अनेकांचे बळी घेणाऱ्या डेंग्यूने मुंबईकर हैराण झाले आहेत. डेंग्यूवर उपचार नाहीच. पपयाच्या पानांचा रस प्या. खजूर खा. बरा होईल, अशा वावड्यांमुळे गोंधळाचे वातावरण आहे. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून भरपूर पाणी प्या आणि आराम करा. मग तुमचे शरीरच डेंग्यूवर उपचार करेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

कसा होतो डेंग्यू?

डेेंग्यूचा डास चावला की पहिल्यांदा परिणाम होतो तो रक्तपेशींवर. रक्तामधील हिमोग्लोबीन अचानक वाढते सामान्यत: १० ते १२ वर असलेल्या लाल रक्तपेशींची संख्या अचानक १६ ते १७ पर्यंत पोहोचते. रक्तामधील पाणी कमी झाल्यानेच हे हिमोग्लोबीन वाढते आणि रक्त घट्ट होते. शरीरावर चट्टे उठणे हे डेंग्यूच्या अंतर्गत रक्तस्रावाचे लक्षण आहे. रक्तपेशी रक्तातील पाणी बाहेर फेकू लागल्याने हिमोग्लोबीन वाढते.अशा परिस्थितीत ते पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे कोणत्याही औषधापेक्षा शरीराला पहिल्यांदा गरज असते ती पाण्याची.

रक्तातील पाणीच कमी झाल्याने. रक्तदाब कमी होऊन सर्वात पहिल्यांदा हृदय प्रक्रिया मंदावते. फुप्फुसालाही संसर्ग होऊन त्याचा परिणाम श्‍वासोच्छ्वासावरही होतो. शरीरातील पाणी कमी झाल्याने किडनीही निकामी होऊ शकतेे. हे अवयव पूर्ववत क्रियाशील करण्यासाठी रुग्णाला व्हँटिलेटरवर ठेवले जाते. त्याला डायलिसीसचाही आधार दिला जातो.

डेंग्यूचे विषाणू तीन प्रकारचे असतात. डेंग्यू १ प्रकारचे विषाणू मानवी शरीराला अधिक घातक.त्यापैकी डेंग्यू १ व ३ हा मानवी शरीरावर परिणाम करतो. या विषाणूंच्या अचानक आक्रमणाने सुरुवातीला प्लेटलेटस् कमी होतात. ही प्रक्रिया चार ते पाच दिवस चालते. या काळात उपचारांबरोबरच रुग्णाने शरीरातील पाण्याचे योग्य ठेवले म्हणजे सात ते आठ लिटर पाणी प्यायला हवे. या काळात पाणी विषाणूचा प्रतिकार करण्याची शक्ती आपोआप निर्माण करते आणि रुग्ण बरा होऊ लागतो.

नक्की काय कराल उपाय?

 - पाणी आणि आराम हाच डेंग्यूवर उपचार असतो.
- शरीरातील पाणी कमी झाल्यानेच ग्लूकोज लावावे लागते.
- योग्य उपचारांनी डेंग्यूचा रुग्ण १० ते १४ दिवसांत पूर्णत: बरा होतो.
- पपयांची पाने, खजूर खाल्ल्याने डेंग्यू बरा होतो हे चुकीचे आणि गैरसमजूतीचे आहे.

 * इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.