सवयीच ठेवतील तुम्हाला चिरतरुण!

चिरतरुण राहावं असं कुणाला वाटत नाही. वयोमानानुसार शरीरात बदल होणारच पण, तुमच्या दिसण्यात आणि विचारांत मात्र हे म्हातारपण येणं गरजेचं नाही. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या आणि म्हातारपण दूर ठेवा.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 15, 2013, 08:26 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चिरतरुण राहावं असं कुणाला वाटत नाही. वयोमानानुसार शरीरात बदल होणारच पण, तुमच्या दिसण्यात आणि विचारांत मात्र हे म्हातारपण येणं गरजेचं नाही. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या आणि म्हातारपण दूर ठेवा.
स्त्रियांमध्ये हा बदल किंवा म्हातारपणाच्या छटा लवकर जाणवायला लागतात. बऱ्याचदा काही स्त्रिया आपल्यापेक्षा जास्त वयांच्या स्त्रियांपेक्षाही म्हाताऱ्या दिसतात. होय, तुम्ही म्हातारपण रोखू शकत नाही पण कमीत कमी तुम्ही म्हातारं दिसणार नाही, याची काळजी तर घेऊ शकता. यासाठी या काही गोष्टी ट्राय करा
मिठापासून लांब राहा…
मीठ आपल्या खाण्यात वेगवेगळ्या माध्यमांतून प्रवेश करतं. जास्त प्रमाणात मीठ घेतलं गेलं तर त्यामुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. गुडघे सुजू लागतात... डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसू लागतात. आपल्याला मीठाची गरज असते पण प्रमाणात... त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.
कपड्यांची पद्धत...
तुमचं वजन थोडं जास्त असलं म्हणून काय झालं... ‘मी काहीही घातलं तरी सडपातळ दिसणार नाही’ असं म्हणत तुम्ही आपल्या कपड्यांकडे दुर्लक्ष करत असाल... तर ते सोडून द्या. थोडं कॅज्युअल आणि फॉर्मल कपडे परिधान करा आणि बघा तुम्ही त्यातही उठून दिसाल. लांब स्वेटर आणि रायडिंग बुटस् आणखीही सुंदर दिसू शकतात.
मेकअप स्टाईल...
कपड्यांसोबत मेकअप स्टाईलमध्येही बदल होत असतात. तुमच्या मेकअपमधूनही तुमच्या वयाचा अंदाज येऊ शकतो. परंतु तुम्ही नव्या नव्या मेकअप स्टाईलचा प्रयोग करण्यापेक्षा तुमचा नेहमीचाच मेक अप केला तरी चालेल. तुमची हीच मेकअप स्टाईल कदाचित पुन्हा एकदा नवीन स्टाईल म्हणून वापरातही येऊ शकते.
खरेदी करताना...
तुमचा वॉर्डरोब संपुर्ण एकदाच बदलण्याची गरज नाही. नवनवीन स्टाईलचे कपडे तुम्ही उतरत्या वयातही ट्राय करू शकता. वस्तू विकत घेतानाही आपल्याला काय चांगलं दिसेल आणि काय नाही याकडे लक्ष द्या.

वयोमानानुसार पचनक्रिया हळूवार होते यामुळे वजन वाढतं. त्यामुळे तुम्ही पहिल्याप्रमाणे नियमित व्यायाम करू शकत नाही. गुडघे दुखू लागतात, पाय दुखू लागतात. अशावेळी पोहणं हाच उत्तम व्यायाम असतो त्याचप्रमाणे चालणं हाही व्यायाम उत्तम... सकाळी थोडं लवकर उठून ताज्या हवेचा आनंद घ्या. अशावेळी जीममध्ये जाऊन एक्स्ट्रा व्यायाम थांबवला तरी चालेल. पण, हलके फुलके व्यायाम नियमित करा.
म्हातारपणाचा तिटकारा नको...
म्हातारपणाचा काही इलाज नसतो. पण, आपल्याला चांगलं दिसण्याचा आणि मनानं तरुण राहण्याचा अधिकार तुम्हालाही आहे. आणि तो तुम्ही बजावायलाच हवा. तरुणपणात जेवढा वेळ तुम्ही तुमच्या दिसण्याकडे देत होतात तेवढाच आत्ताही द्या...

जीवनाचा संपूर्ण आनंद घ्या...
आपलं जीवन सक्रियतेने जगणाऱ्या स्त्रिया आपल्या जीवनाचा संपूर्ण आनंद घेतात. आपल्या कामात स्वत:ला व्यस्त ठेवा. मेनोपॉजनंतर स्त्रिया आपल्याकडे सकारात्मक पद्धतीनं पाहतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.