मुंबई : दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. तर हळदीत अॅंटीबायोटीक असते. त्यामुळे हळद टाकून दूध प्यायल्याने त्याचे लाभ दुहेरी होतात.
श्वास घेण्याबाबात ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होण्यास मदत होती. फेफडा, कफ यावर तत्काळ आराम पडतो.
हळद टाकलेले दुध घेतल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. कॅल्शिअम आणि मिनिरल तसेच पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी मदत करते.
दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होती.
आयुर्वेदात हळदीला महत्व दिले गेले आहे. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते.
हळद युक्त दूध घेतल्यामुळे पचनासंबंधी ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होतात. अल्सर आणि कोलाइटिस बरे करण्यास मदत करते. अल्सर, डायरिया आणि अपचन समस्या दूर होतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.