www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दरवर्षी जगभरात अपघातात मृत्यूमखी पडणा-यांची संख्या लाखोंच्या घरात...यामध्येही अनेकदा रुग्णांना आवश्यक रक्तगटाचे रक्त न मिळाल्याने जीव गमवावा लागतोय. मात्र आता चिंता करण्याचं कारण नाही.. कारण रक्त आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
तु्म्ही कोणत्याही राज्यात असाल आणि रक्ताची तात्काळ गरज असल्यास चिंता करु नका... कारण आता एका क्लिकवर तुम्हाला पाहिजे त्या ग्रुपचं रक्त मिळणं शक्य होणार आहे.. URL|blooddonordata.co.in ही वेबसाईट बनवण्यात आलीय.. तुमच्या शहरातले रक्तदाते, त्यांचा रक्तगट आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर या वेबसाईटवर मिळणार आहे.. वाशिममधल्या आश्रय या सेवाभावी संस्थेनं ही वेबसाईट बनवण्यासाठी पुढाकार घेतलाय.. सध्या वाशिममधल्या रक्तदात्यांची माहिती या वेबसाईटवर असून लवकरच राज्यभरातील रक्तदात्यांची अद्ययावत माहिती यावर देण्यात येणार आहे.
वाशिममध्ये या नव्या वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आलाय. आगामी काळात शासकीय पातळीवरही अशा प्रकारच्या उपक्रमांना मदत करणार असल्याचे वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.
आज समाजात अनेक चळवळी मोठ्या प्रमाणात राबविल्या जातायेत. मात्र थेट एखाद्या व्यक्तीला जीवन देणारी ही रक्तदान चळवळ कौतुकास्पद म्हणावी लागेल...
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.