मुंबई : दिवाळीत उडवल्या जाणा-या फटाक्यांमुळं अस्थमा आणि श्वसनाचे आजार असलेल्या रूग्णांना अधिक त्रास होतो.
या दिवसांत अशा रूग्णांची संख्या तिपटीने वाढत असल्याचे पुढे आलेय. तसेच डोळ्यांना त्रास होवून डोळे दगावण्याची वेळही लहान मुलांवर फटाक्यांमुळं येते. दिवाळी म्हटले की फटाक्यांचा कानठळ्या बसणारा आवाज, आतषबाजी आलीच. फटाक्यांच्या आवाजाबरोबरच त्यातून निघणाऱ्या धुरांमुळेही आरोग्यावर दूरगामी होत असल्याचे समोर आलंय.
अधिक वाचा : फटाके उडवतांना घ्या ही काळजी!
फटाके फोडल्यानंतर त्यातून सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रेस गँसेस बाहेर पडतात. ज्याचा सर्वाधिक त्रास अस्थमा, श्वसनाचा आजार आजार असणाऱ्या रूग्णांना होतो. मुंबईत तर दिवाळीच्या दिवसांत २५ टक्के नवे रूग्ण असे येतात. ज्यांना पूर्वी कधीही अस्थमा किंवा श्वसनचा त्रास नव्हता. या दिवसांत रूग्णांची संख्या तीनपट अधिक असते. लहान मुलांची फुफुसे छोटी असल्यानं त्यांना फटाक्यांचा धुराचा अधिक त्रास होतो, असे डॉक्टरांनी सांगितले.
आधीच वायूप्रदूषण अधिक असलेल्या मुंबईत दिवाळीच्या दिवसांत अस्थमा रूग्णांना राहणं मुश्किल होते. त्यामुळं अशा रूग्णांना दिवाळीमध्ये मुंबई बाहेर राहण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.