घरातच बरे करा तुमचे ब्लडप्रेशर, हे आठ उपाय

मुंबई : तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल म्हणजे ब्लडप्रेशर तर त्यात तुमच्या जीवनशैलीचाही मोठ्या प्रभाव असू शकतो.

Updated: Mar 2, 2016, 05:20 PM IST
घरातच बरे करा तुमचे ब्लडप्रेशर, हे आठ उपाय    title=

मुंबई : तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल म्हणजे ब्लडप्रेशर तर त्यात तुमच्या जीवनशैलीचाही मोठ्या प्रभाव असू शकतो. त्यासाठी तुमच्या दिनचर्येत काही बदल केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. हे उपाय केल्यास तुम्हाला जास्त औषधं खाण्याची गरज पडणार नाही. 

१) वजन घटवा  
तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असण्यास बऱ्याच अंशी तुमचे वजन जबाबदार असू शकते. तुमचे वजन जास्त असल्यास ते कमी करण्याचा नेहमी प्रयत्न करा. ज्या पदार्थात कमी फॅट्स आहेत अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. 

२) व्यायाम  
वजन कमी करण्यासाठी दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करा. ते शक्य नसल्यास चालण्या - फिरण्याची तरी कामे करा. या व्यायामाच्या सवयीत खंड पडू देऊ नका. कारण, तसा खंड पडल्यास तुम्हाला पुन्हा रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते. 

३) आरोग्यदायी आहार घ्या  
आरोग्यदायी आहार याचा अर्थ असा की तुमच्या आहारात जास्तीत जास्त हिरव्या भाज्यांचा आणि पालेभाज्यांचा समावेश करा. तसेच जास्तीत जास्त फळे खा. तेल आणि तूपाचा जास्त वापर करुन तयार केलेले पदार्थ कमीत कमी खा. 

४) मीठ कमी खा  
उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहारात मीठाचा वापर कमी करा. यामुळे बराच फरक पडू शकतो. 

५) दारू कमी प्या  
ज्यांना मद्यपानाची सवय आहे त्यांनी ती कमी करावी. रक्तदाबाचा त्रास असताना तुम्ही जर दारूचे सेवन करत असाल त्याचे तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. 

६) धुम्रपान  
धुम्रपान करणे हेसुद्धा रक्तदाबाचा त्रास सुरू होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी धुम्रपानाची सवय ताबडतोब सोडून द्या. 

७) कॉफीचे सेवन कमी करा  
तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर कॉफीचे सेवन कमी करा. शक्य असल्यास कॉफी पिणे थांबवल्यास जास्ती उत्तम ठरेल. कॉफीतील कॅफेन रक्तदाब वाढवण्यास मदत करते. 

८) तणावमुक्त राहा  
रक्तदाबाचा त्रास होत असल्यास तणावमुक्त राहा. थोडा आराम करा. शरीरासोबत तुमच्या मेंदूलाही त्रास देऊ नका. तुमचा रक्तदाब नियमीत तपासा.