हृदयविकार होऊ नये म्हणून या गोष्टी लगेच सोडा

धुम्रपान करणे हे हृद्यविकाराला आमंत्रण असतं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तर धूम्रपान लगेचच सोडायला हवं. काही महिलांमध्येही आता हृ्दयविकाराचं प्रमाण वाढलं आहे. यामागे धुम्रपान हे कारण असल्याचं समोर आलंय. 

Updated: Jun 9, 2016, 07:12 PM IST
हृदयविकार होऊ नये म्हणून या गोष्टी लगेच सोडा title=

मुंबई : धुम्रपान करणे हे हृद्यविकाराला आमंत्रण असतं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तर धूम्रपान लगेचच सोडायला हवं. काही महिलांमध्येही आता हृ्दयविकाराचं प्रमाण वाढलं आहे. यामागे धुम्रपान हे कारण असल्याचं समोर आलंय. 

१. तूप आणि तेलाचा आहारात अतिशय कमी वापर करा. चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनाने कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतो त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. 
 
२. पेस्ट्री, केक, साखरेचे पदार्थ खाणे टाळा. यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.

३. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. १५०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाणार्‍यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात मीठाचं प्रमाण कमी करा.
 
४. चरबीयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ टाळा. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पडून राहू नका. डॉक्टरांचा लगेच सल्ला घ्या.
  
५. मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपोथायरोडिजम अशा विकारांकडे दुर्लक्ष करू नका.

 
६. जास्त व्यायाम केल्यानं रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. 
 
७. थकवा, छातीत दुखणं, घाम येणं अशा समस्या असतील तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.