म्हातारपण लवकर येऊ नये म्हणून एवढंच करा

वेळ ही कोणासाठीही थांबत नाही. वय वाढत जातं आणि शरिराची काम करण्याची ताकद कमी होत जाते. आपण वेळ थांबवू शकत नाही. पण लवकर येणार म्हातारपण मात्र थांबवू शकतो. यासाठी तुम्हाला कोणतीही औषधं घेण्याची गरज नाही. 

Updated: Dec 14, 2015, 08:35 PM IST
 म्हातारपण लवकर येऊ नये म्हणून एवढंच करा title=

मुंबई : वेळ ही कोणासाठीही थांबत नाही. वय वाढत जातं आणि शरिराची काम करण्याची ताकद कमी होत जाते. आपण वेळ थांबवू शकत नाही. पण लवकर येणार म्हातारपण मात्र थांबवू शकतो. यासाठी तुम्हाला कोणतीही औषधं घेण्याची गरज नाही. 

1. म्हातारपण लवकर येऊ नये यासाठी तुम्ही काही मानसिक आणि शारीरिक प्रयत्न करायला हवेत. 
2. आहारासोबतच शिस्त, संयम, शारीरिक श्रम आणि आवश्यक झोप घेणं महत्त्वाचं आहे. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चांगले संबध तयार करायला हवेत. 

3. आपल्यासारखे विचार करणाऱ्या 4-5 जणांचा ग्रुप तयार करा. धार्मिक गोष्टीही करा ज्यामधून मनाला शांती मिळते. 

4. लहान मुलांशी रोजचा संबंध असणे ही एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तुमचं मन आनंदी ठेवण्यासाठी मदत होते. 

5. आजूबाजूच्या लोकांसोबत चांगले संबंध ठेवा. शहरात फ्लॅट सिस्टीममुळे वेळ एकांतातच घालवावा लागतो. ज्यामुळे मानसिकता ढासळते आणि वाईट विचार मनात येतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.