नवी दिल्ली : जर तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करायचे मात्र त्यासाठी तुम्हाला मेहनत करायची नाही आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हो, कोणतेही एफर्ट न घेता तुम्ही वजन घटवू शकता. त्यासाठी आहेत या खास टिप्स
१. खाण्याची सुरुवात एक ग्लास पाण्याने करा. यामुळे तुमचे पोट लवकर भरेल आणि अधिक खाणेही टळेल. तसेच तुमचे शरीर हायड्रेटही राहील
२. खाण्यातून कॅलरीचे प्रमाण कमी करा. जर तुम्ही भात आणि पोळी एकाच वेळी खात असाल. तर भात खाऊ नका अथवा पोळी कमी खा
३. जेवणानंतर गोड खाण्याची सवय असेल तर वेगळे काही खाण्यापेक्षा चॉकलेटचा तुकडा खा.
४. वर्कआऊटसाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर कामादरम्यान अधिक वेळ मूव्हमेंट करा. लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर करा
५. तुम्हाला वजन घटवायचे असेल तर छोट्या प्लेटमध्ये जेवण घ्या. यामुळे प्लेटमध्ये खाणेही कमी होईल आणि तुम्हीही कमी खाल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.